शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
3
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
4
आरडीएक्सने स्फोट करून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणेत खळबळ
5
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
6
तीन वर्षांत बावनकुळेंच्या संपत्तीत ३९ टक्क्यांनी वाढ; नावावर एकही कार नाही
7
"वेळ बदलते, फार उशीर लागत नाही"; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट
8
Smriti Mandhana चा शतकी तोरा; न्यूझीलंड विरुद्ध हरमनप्रीत ब्रिगेडनं दिमाखात जिंकली मालिका
9
महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना ८७, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना किती जागा?
10
ऑनलाइन बेटिंगशी संबंधित वेबसाइटवर ईडीचा छापा, करोडोंची मालमत्ता जप्त
11
AI'च्या मदतीने अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराने यशस्वी ऑपरेशननंतर खुलासा केला
12
नाना पटोलेंनी तिकिट विकलं; माजी आमदारानं गंभीर आरोप करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
13
"आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही"; मलिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपची स्पष्ट भूमिका
14
हरिद्वारमध्ये ट्रेन उडवण्याचा कट; ट्रॅकवर आढळला डेटोनेट, संशयित तरुण ताब्यात
15
काँग्रेसने तिकीट दिलं, पण एबी फॉर्मच दिला नाही; दिलीप मानेंनी अपक्ष भरला अर्ज
16
IND vs NZ : भारताला भारतात पराभूत करणं शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिलं - टीम साऊदी
17
हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर
18
अचानक Instagram डाऊन; मेसेज पाठवण्यात अडचणी, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस...
19
महायुतीसमोर मताधिक्य राखण्याचे आव्हान, मविआची 'या' 11 मतदारसंघात काय होती स्थिती?
20
'दाऊदचा साथीदार फडणवीसांच्या जवळ..', मलिकांच्या उमेदवारीवरुन चतुर्वेदींची बोचरी टीका

ऋषी मुनींसारखे निरोगी दीर्घायुष्य मिळवणे आपल्या हातात आहे; त्यासाठी करा 'हे' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 2:39 PM

निरोगी, दीर्घायुष्य मिळावं ही सर्वांचीच अपेक्षा असते, मात्र त्यासाठी सोपा आणि बिनखर्चिक उपाय आपण करत नाही. त्याची सुरुवात करा.

नैसर्गिक रित्या अहोरात्र म्हणजे २४ तासांत २१,६०० वेळा श्वासोच्छ्वास करतो. त्या श्वासोच्छ्वासातही शीतकाल उष्णकाल यांस अनुसरून डाव्या व उजव्या बाजूने विशिष्ट नैसर्गिक शास्त्रीय व्यवस्थेनुसारच श्वासोच्छ्वास होत असतो. ईश्वराने नाकाला दोन छिद्रे ठेवली आहेत. त्यामागे शास्त्रीय हेतू आहेत. एवढ्या मोठ्या मानवपिंडावर एक केससुद्धा अनावश्यक वा निर्हेतुक नाही. संपूर्ण प्राण ज्या श्वासप्रक्रियेवर अवलंबून आहे, तो श्वासोच्छ्वास ज्या नाकाने व्हावयाचा त्या नाकाची रचनाही ईश्वराने शास्त्रीय केली आहे. 

षट्शतानि दिवारात्रौ सहस्राण्येकविशति:एतत्संख्यात्मकं मैत्रं जीवो जपति सर्वदा।

म्हणजेच दिवसभरात मानव २१,६०० वेळा `सोऽहम' शब्दाचा जप करत असतो, तितक्या वेळा त्याची श्वसनक्रिया होत असते. योगशास्त्रानुसार नाकाच्या डाव्या पुडीला सूर्य व उजवीला चंद्र असे नाव दिले गेले आहे. डाव्या नाकपुडीत इडा नाडी व उजव्या नाकपुडीत पिंगला नाडी आहे. सूर्य पुडीने श्वास घेतल्यास उष्णता व चंद्रनाडीने श्वास घेतल्यास थंडी फुप्फुसात प्रविष्ट हाटे. आज आपणास हे माहितीही नाही की कधी कोणत्या नाकपुडीने श्वास घ्यावा. परंतु आपले पूर्वज दिवसातून तीन वेळा या श्वसनप्रक्रियेची साधना करत असत. या श्वसनप्रक्रियेचे धार्मिक नाव `संध्या' असे आहे. संध्येत प्राणायाम हे मुख्य व परमलाभक असे तत्त्व आहे. या श्वस क्रियेच्या साधनेत आयुष्यवृद्धि होते व ही साधना आपल्या हातात आहे. 

ऋषयो दीर्घसन्ध्यात्वात दीर्घमायुरवाप्नुयु:।

हे मनूचे वचन वर आलेच आहे. ऋषींच्या दीर्घायुष्याचे रहस्य संध्येतच आहे, असा या वचनाचा आशय आहे.योग शास्त्राने प्राणायामाचा व श्वासप्रक्रियेचा खोल अभ्यास केला. ही श्वसनक्रिया निरनिराळ्या अवस्थेत निरनिराळी असते. 

स्थितस्य द्वादश श्वासाश्चलतोऽष्टादश स्मृता:।चतुर्विशति सुप्तस्य, त्रिशद ग्राम्ययरतस्य च।।

मनुष्य बसला असता १२, चालताना १८, झोपलेला असताना २४, विषय सेवनाचे वेळी ३० असे दर मिनिटांच्या हिशोबात श्वास घेतो. याचा अर्था त्या त्या अवस्थेत श्वास अधिक प्रमाणात खर्ची पडतात. म्हणजेच तितक्या प्रमाणात मानवाचे आयुष्य अधिक झपाट्याने नष्ट होते. शरीराचे व्याप तर चालूच राहणार आणि हा आयुष्य नाशही असाच होत राहणार. तरीसुद्धा त्या अवस्थेत होणारा ऱ्हास टाळण्यासाठी श्वासांचा निरोध करून त्याची भरपाई करणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर ही भरपाई करूनही मूळातील २१६०० श्वासातूनही काही वाचवले तर अधिक चांगले. यासाठीच श्वासनिरोधरूप `प्राणायाम' त्यावर उत्तम उपाय म्हणून शास्त्रकारांनी आपल्यापुढे ठेवला आहे. 

ईश्वराने दिलेली श्वाससंख्या म्हणजे आयष्य. दिलेली श्वास संख्या प्राणायामाने दीर्घकाळ वापरता येते. आयुष्य वाढवणे आपल्या हाती आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स