शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 28, 2020 3:18 PM

Adhik Maas 2020: संकल्प असेच करावेत, जे आपल्याला पूर्ण करता येतील किंवा जे आपल्या आवाक्यात असतील.

ठळक मुद्देअधिक मासात तीस तीन या संख्येला खूप महत्त्व असते.दर ३३ महिन्यांनी 'अधिक मास' येतो. म्हणून या महिन्यात सगळ्या गोष्टी तीस तीन या पटीत करतात.

ज्योत्स्ना गाडगीळ.

अधिक मासात तीस तीन या संख्येला खूप महत्त्व असते. अनेक जण अधिक मासानिमित्त ३३ जणांना वाण, ३३ जणांना भोजन, ३३ जोडप्यांसह सामुहिक पूजा, ३३ जणांना दान असे नानाविध संकल्प करून अधिक फलप्राप्ती करून घेतात. आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात काही करणे शक्य नसले, तरी सहज साध्य करता येतील असे काही संकल्प आहेत. ते ३३ संकल्प जाणून घेण्याआधी या संख्येमागील गणित समजावून घेऊ. 

तीस तीनच का?

चैत्रापासून फाल्गुनापर्यंत १२ महिन्यात ३५५ दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस ३६५ असतात. हे १० दिवस तीन वर्षांनी ३० दिवस झाल्यावर एक महिना अधिक घालून ते पुन्हा सारखे होतात. म्हणजे, दर ३३ महिन्यांनी 'अधिक मास' येतो. म्हणून या महिन्यात सगळ्या गोष्टी तीस तीन या पटीत करतात.

हेही वाचा: Adhik Mass 2020: तन्नो विष्णू: प्रचोदयात।; श्री विष्णूंचे पाच श्लोक ठरतील पुण्यफलदायी

३३ सकारात्मक संकल्प!

संकल्प असेच करावेत, जे आपल्याला पूर्ण करता येतील किंवा जे आपल्या आवाक्यात असतील. समाज माध्यमांवर एक छान मेसेज वाचला. त्यात हे ३३ संकल्प सुचवले होते. `जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्याशी सांगावे, सूज्ञ करून सोडावे सकळ जन', या उक्तीप्रमाणे ते संकल्प लेखाच्या माध्यमातून देत आहे.

१) सदाचार २) सद्भावना ३) समयसूचकता४) समयपालन ५) समंजसपणा ६) सात्त्विकता७) सहजता (वागण्या-बोलण्यात) ८)सौजन्य९) स्नेहभाव १०) स्वयंशिस्त ११) स्वाभिमान१२) सौम्यपणा १३) सुदृढता (शारीरिक व मानसिक)१४) सत्यवादित्व १५) संकल्प १६) संयम१७) स्मितहास्य १८) सदसद्विवेक १९) सत्संगती२०) समर्पणभाव २१) सरळपणा २२) सौंदर्यदृष्टी२३) सेवाभाव २४) सखोलज्ञान (विशेषत: आपल्या क्षेत्रात)२५) सरसत्व २६) सातत्य २७) समाधान२८) स्वावलंबन २९) सजगता ३०) सुसंस्कार३१) सहनशीलता ३२) सकारात्मकता ३३) सद्गुरुसेवा

या सकारात्मक गोष्टी आत्मसात होण्यासाठी वेळ लागेल, परंतु अधिक मासाच्या मुहूर्तावर आपल्याला प्रयत्नांची सुरुवात नक्कीच करता येईल. 'अधिकस्य अधिकं फलम्' मिळवायचे असेल, तर अधिक मेहनत लागणारच ना?

हेही वाचा: Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनामाची महतीः चोच दिली, तो चारा देतोच!

तीस तीन गोपद्म रांगोळी

अधिक मासात कोणत्याही दिवशी किंवा सलग महिनाभर ७,६,५,५,४,३,२,१ अशी गोपद्मांची चढत्या क्रमाने रांगोळी काढतात. इथेही तीस तीन संख्या आलीच. वास्तविक पाहता, संपूर्ण चातुर्मासात तीस तीन गोपद्मांची रांगोळी काढण्याची प्रथा आहे. त्याला गोपद्म व्रत असेही म्हणतात. गोपद्म हे चिन्ह रांगोळीत शुभ मानले जाते. गो पद्म अर्थात गायीच्या पावलांचा ठसा. त्याचे प्रतिकात्मक रूप रांगोळीत काढतात. भगवान महाविष्णूंना गाय अतिशय प्रिय आहे. कृष्णावतारात तर ते 'गोपाल' झाले होते. जे त्यांना प्रिय, तेच त्यांना समर्पण करण्याची भावना भाविकांच्या ठायी असते. तिच तीस तीन गोपद्म चातुर्मासात किंवा अधिक मासात देवघरासमोरील पाटावर साकारली जातात.

हेही वाचा: Adhik Maas २०२०: आपण नैवेद्य दाखवतो, की अर्पण करतो? 

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना