शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Adhik Maas 2020: भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। (उत्तरार्ध)

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 10, 2020 7:30 AM

Adhik Maas 2020: शिवानंद स्वामींनी जगदिशाला उद्देशून लिहिलेली आरतीदेखील अतिशय सुरस आणि भावपूर्ण आहे. त्या शब्दांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिक मासाहून दुसरे चांगले औचित्य कोणते!

ज्योत्स्ना गाडगीळ

आरती म्हणजे आर्तता. आरती म्हणजे प्रार्थना. आरती म्हणजे संवाद. तोही कोणाशी? तर प्रत्यक्ष देवाशी. ती समजून उमजून म्हटली, तर आपला आनंद द्विगुणित होता़े  मात्र, आपण सूर-तालात एवढे रंगून जातो, की आपले आरतीच्या भावार्थाकडे लक्षच जात नाही. मराठीतील अनेक आरत्या आपल्याला तोंडपाठ आहेत. तशीच हिंदी भाषेतील शिवानंद स्वामींनी जगदिशाला उद्देशून लिहिलेली आरतीदेखील अतिशय सुरस आणि भावपूर्ण आहे. ती म्हणत असताना, आपण थेट देवाशी बोलत आहोत की काय, असा भास होतो. त्या शब्दांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिक मासाहून दुसरे चांगले औचित्य कोणते...आरतीचा पूर्वार्ध आपण काल पाहिला, आज त्याचा उत्तरार्ध!

हेही वाचा: Adhik Maas 2020: भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। (पूर्वार्ध)

तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति,किस विधी मिलू दयामय, तुमको में कुमति।।

भगवंता, गीतेत तूच अर्जुनाला सांगितले आहेस, 'अहं वैश्वानरो भूत्वा, प्राणिनाम् देहमाश्रिता' अर्थात, तू सर्वव्यापी सामावलेला आहेस आणि सर्व प्राणिमात्र, हे तुझेच सगुण रूप आहे. त्यांचे पालन करणारा, तू प्राणपति आहेस. फक्त तुला पाहण्याची दृष्टी माझ्याजवळ नाही. म्हणून मी मठात, मंदिरात, निसर्गात, सर्वत्र तुझा शोध घेत, फिरत आहे. मात्र, कविवर्य सुधीर मोघे म्हणतात त्याप्रमाणे, 'मंदिरत अंतरात, तोच नांदताहे, नाना देही, नाना रूपी, तुझा देव आहे...' मात्र, माझ्या कुमतिला म्हणजेच जडबुद्धी असणाऱ्या भक्ताला तू दिसत नाहीस, तुला पाहण्याची दृष्टी दे.

दीन बंधु, दु:ख हर्ता, ठाकूर तुम मेरे,अपने हाथ उठाओ, द्वार पडा तेरे।।

लहान बाळासाठी त्याची आई, हीच त्याचे सर्वस्व असते. त्याला कोणत्या वेळी काय हवे, नको ते ती पाहते. न मागता, न सांगता देते. मायेने काळजी घेते, सांभाळते. आपल्या मायेची सावली बाळावर धरते. तसा भगवंतही आपल्या भक्तावर कृपेची सावली ठेवतो. जो प्रयत्नवादी आहे, त्याला हात देतो. दु:ख दूर करतो. मात्र, कधी कधी तो कामात एवढा व्यस्त असतो, की बाळासारखे धाय मोकलून रडल्याशिवाय, पोटतिडकिने हाक मारल्याशिवाय जवळच घेत नाही. भगवंताला विश्वाचा पसारा सांभाळायचा आहे, याची भक्ताला जाणीव असते, परंतु भक्तासाठी तोच सर्वस्व आहे. त्याने साथ सोडून कसे बरे चालेल? 

विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा,श्रद्धा भक्ति बढाओ, संतन की सेवा।।

यावरून महाभारतातला किस्सा आठवतो. माता कुंतीने भगवान श्रीकृष्णाला सांगितले, 'भगवंता, मला द्यायचेच असेल, तर खूप दु:ख दे. जेणेकरून मला सतत तुझा आठव राहील.' किती यथार्थ मागणे आहे हे! संकटकाळी भगवंताची आठवण होणे, हा मनुष्यस्वभावच आहे. म्हणून शिवानंद स्वामी शेवटच्या कडव्यात म्हणतात, 'विषय, विकार मिटाओ, पाप हरो देवा' आम्ही विषयांत एवढे अडकले आहोत, की तुझा आम्हाला विसर पडतो. आम्ही कशासाठी जन्माला आलो आहोत, हे उद्दिष्ट विसरतो. समाजसेवा, संतसेवा, देशसेवा या कारणी देह झिजवायचा सोडून विषयांमध्ये अडकून आयुष्य संपवतो. म्हणून आमची श्रद्धा, भक्ती, आत्मविश्वास, बंधूभाव, भूतदया तुलाच वाढवायची आहे. ते तू नक्की करशील, याची खात्री आहे, म्हणून ही आरती गात आहे.ओम जय जगदिश हरे!

हेही वाचा : Adhik Maas 2020: अधिक मासात कोणता जप, कसा आणि किती करावा?

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना