शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Adhik Maas 2020: भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे। (पूर्वार्ध)

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 09, 2020 7:30 AM

Adhik Maas 2020: शिवानंद स्वामींनी जगदिशाला उद्देशून लिहिलेली आरती अतिशय सुरस आणि भावपूर्ण आहे. त्या शब्दांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिक मासाहून चांगले औचित्य कोणते?

ठळक मुद्देआरती समजून उमजून म्हटली, तर आपला आनंद द्विगुणित होता़े. आरती म्हणत असताना, आपण थेट देवाशी बोलत आहोत की काय, असा भास होतो.

ज्योत्स्ना गाडगीळ

आरती म्हणजे आर्तता. आरती म्हणजे प्रार्थना. आरती म्हणजे संवाद. तोही कोणाशी? तर प्रत्यक्ष देवाशी. ती समजून उमजून म्हटली, तर आपला आनंद द्विगुणित होता़े  मात्र, आपण सूर-तालात एवढे रंगून जातो, की आपले आरतीच्या भावार्थाकडे लक्षच जात नाही. मराठीतील अनेक आरत्या आपल्याला तोंडपाठ आहेत. तशीच हिंदी भाषेतील शिवानंद स्वामींनी जगदिशाला उद्देशून लिहिलेली आरतीदेखील अतिशय सुरस आणि भावपूर्ण आहे. ती म्हणत असताना, आपण थेट देवाशी बोलत आहोत की काय, असा भास होतो. त्या शब्दांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिक मासाहून दुसरे चांगले औचित्य कोणते...

ओम जय जगदिश हरे, स्वामी जय जगदिश हरे,भक्त जनों के संकट, क्षण में दूर करे।।

ओंकारशक्तीत सामावलेल्या जगदिशाचा जयजयकार असो. तू आम्हा भक्तांवर आलेले संकट क्षणात दूर करतो. तो क्षण यायला वेळ लागतो, कारण आमच्या संकटकाळी आम्हाला कणखर बनवण्यासाठी तू परीक्षा पाहतोस. परंतु, कितीही झाले, तरी भक्ताला अपयश येऊ देत नाहीस आणि एका क्षणात चित्र पालटून टाकतोस.

हेही वाचा: Adhik Maas 2020: सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?

जो ध्यावे फल पावे, दु:ख विनसे मनका।सुख संपती घर आवे, कष्ट मिटे तन का।।

देवाने प्रत्येकाची सोय लावून ठेवलेली असते. भक्ताने काही मागण्याआधीच त्याने भरभरून दिलेले असते. तरीदेखील, भक्ताच्या प्रयत्नांना जोड म्हणून तू अनुकूल वातावरण तयार करतोस आणि त्याच्या प्रयत्नांना यश देतोस. प्रयत्नवादी व्यक्ती अपयशाला घाबरत नाही. संकटातही संधी शोधत असते. अशा लोकांचा तू मार्गदर्शक होतोस आणि त्यांना इच्छित फळ देतोस. 

माता पिता तुम मेरे, शरण गहू में किसकी,तुमबिन और न दुजा, आस करू में किसकी।

जो भक्त आपल्या भगवंतामध्ये सर्व नाती शोधतो किंवा प्रत्येक नात्यात भगवंताला शोधतो, तो कधीच एकटा पडत नाही. त्याच्यासाठी 'तुमही हो बंधू सखा तुम्ही' अशीच भगवंताप्रती भावना असते. भगवंत हाच सुख-दुख:चा वाटाड्या होतो. 'सुख सांगावे सकलासी, दु:ख सांगावे देवासी' या उक्तीप्रमाणे, भक्त आपल्या देवाप्रती समर्पित असता़े.  तो सोबत असताना, अन्य कोणाची आस राहतच नाही. भगवंत प्रत्येक रूपात नाते निभावून भक्ताचे आयुष्य परिपूर्ण करतो. 

तुम पुरण परमात्मा, तुम अंतर्यामी, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी।।

तुझ्यापासून काहीच लपलेले नाही. एकवेळ जगाशी खोटे बोलू शकतो, स्वत:लाही फसवू शकतो, मात्र, तुझ्याशी काहीच लपवून ठेवू शकत नाही. कारण, माझा उगमच तुझ्यातून झाला आहे. तूच गीतेत म्हणून ठेवले आहेस, `ममै वांशो जीवलोके' अर्थात सृष्टीवरचा प्रत्येक जीव हा तुझाच अंश आहे आणि प्रत्येक जीवाचा सांभाळ करणाराही तूच आहेस. तू पाठीशी असताना, कसलीही भीत वाटत नाही. तुझी सोबत होती, म्हणूनच तर कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा विजय झाला. आमच्याही संसार रथाचे सारथ्य तुला करायचे आहे. म्हणून हे परमात्मा, अर्जुनासारखे आम्ही तुलाच मागून घेत आहोत. 

तुम करुणा के सागर, तुम पालन कर्ता,में मुरख खल कामी, कृपा करो भर्ता ।।

मनुष्य स्वभाव हा षडविकारांशी जोडलेला आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यामुळे कितीही नाकारले, तरी दुसऱ्या  व्यक्तीबद्दल आमच्या मनात कमी अधिक प्रमाणात असूया, तिरस्कार, राग, द्वेष असतोच. मात्र, तू आमचे अनंत अपराध पोटात घेऊन आम्हाला रोज नवी संधी देतोस. तरी आम्ही मूर्ख तुझे महत्त्व न ओळखता, तुझ्यावरच राग धरतो. आमच्या चुका पदरात घे आणि आम्हाला सद्बुद्धी दे. 

क्रमश:

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासात करावे दीपदान, जग करूया प्रकाशमान

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना