शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
2
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
3
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
4
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
5
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
6
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
7
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
8
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
9
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
10
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
12
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
13
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
14
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
15
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
16
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
17
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
18
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
19
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
20
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

अधिक मास: ‘हा’ मंत्र म्हणा, अपार गुरुबळ मिळवा; ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ विश्वास ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 3:35 PM

Adhik Maas Shravani Guruwar Swami Samarth: अधिक मासातील पहिला श्रावणी गुरुवार आहे. स्वामींची कृपादृष्टी मिळावी, समस्या-अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी हा मंत्र आवर्जून म्हणा. श्री स्वामी समर्थ...

Adhik Maas Shravani Guruwar Swami Samarth: मराठी वर्षात महत्त्वाचा मानला गेलेला सात्विक काळ चातुर्मास सुरू झाला. चातुर्मासात यंदा श्रावण महिना अधिक आला आहे. अधिक मासाला परंपरा अन् संस्कृतींमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. सुमारे ३ वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात केलेली आराधना, उपासना, नामस्मरण यांचे पुण्य सामान्यापेक्षा १० पट अधिक मिळते, अशी मान्यता आहे. अधिक मास श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याचा पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. या अधिक मासात स्वामींचे नामस्मरण, उपासना, मंत्र/स्तोत्र पठण शुभ-फलदायी मानले गेले आहे. 

अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. असहाय्य, तेजहीन, दुर्बल झालेल्या समाजाला त्यांनी ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, हा दिलासा दिला. खुद्द स्वामी आपली पाठराखण करत आहेत, हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले, तरी स्वामी कृपेने त्यांचे सान्निध्य भाविकांना पदोपदी जाणवते. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ 'श्री स्वामी समर्थ' असा नामोच्चार केला, तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामीकृपा मिळून गुरुबळ वाढावे, अधिक मासात स्वामींची साधना पुण्य-फलदायी व्हावी, यासाठी स्वामींचा एक मंत्र आवर्जुन म्हणावा, असे म्हटले जाते. 

स्वामी समर्थांचा प्रभावी मंत्राचे बळ

सुखानंतर दुःख आणि दुखःनंतर सुख हे जीवनचक्र आयुष्यभर सुरूच असते. त्यापासून कुणाचीही सुटका झालेली नाही. मनुष्य जन्म म्हटला की सगळे भोग हे आलेच. अगदी देवाचीही त्यापासून सुटका झालेली नाही. माणसाला संघर्ष चुकलेला नाही. मात्र, त्यातून बाहेर येण्यासाठी समस्यांचे निवारण करण्यासाठी माणूस सतत कार्यरत असतो. समस्या, अडचणीत स्वामी समर्थांचा मंत्र प्रभावी ठरू शकतो. समस्या दूर झाल्या नाहीत, तरी त्याच्याशी लढण्याचे बळ, शक्ती मिळू शकते, असे सांगितले जाते. ताणतणाव, नैराश्य यात अडकलेल्या प्रत्येक जीवाला हा स्वामी मंत्र तणाव नियंत्रणाचे धडे देतो. या मंत्रातले साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहेत. उठल्यावर सकाळी आणि रात्री झोपताना हा मंत्र म्हणण्याचा आणि समजून घेण्याचा सराव केला, तर आयुष्यातून ताणतणाव कोसो दूर पळून जाईल, अशी अनेकांची श्रद्धा आहे. 

स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी तारक मंत्र

निःशंक हो, निर्भय हो, मना रेप्रचंड स्वामीबळ पाठीशी रेअतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामीअशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामी पाय तिथे न्युन कायस्वये भक्त प्रारब्ध घडवी ही मायआज्ञेविणा काळ ना नेई त्यालापरलोकही ना भिती तयाला ।।२।।

उगाची भितोसी भय पळू देजवळी उभी स्वामी शक्ती कळू देजगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचानको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।

खरा होई जागा तू श्रद्धेसहितकसा होशी त्याविण तू स्वामीभक्तकितीदा दिला बोल त्यांनीच हातनको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।

विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थस्वमीच या पंच प्राणाभृतातहे तिर्थ घे, आठवी रे प्रचितीन सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

।।श्री स्वामी समर्थ।। 

टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे