पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. एका छताखाली दोन तीन पिढ्याच नव्हे तर दोन तीन कुटुंबही आनंदात नांदायची. घरात एवढी मंडळी असूनही प्रत्येकाच्या हाताला काम असे. कोणी रिकामे बसून राहत नसे. ही कामे बळजबरीने नाही तर स्वेच्छेने निवडलेली असायची. पैकी आजीबाईंच्या वाट्याला येणारे काम म्हणजे दिव्याच्या वाती करणे. कथा कीर्तन ऐकायला जाताना आजी कापसाचा पुंजका घेऊन जात असत आणि कथा ऐकता ऐकता सुबक सुंदर वाती बनवत असत. आपल्याला माहित असलेल्या वाती फार तर चार ते पाच प्रकारांच्या, पण पूर्वी वातीचेच अनेक प्रकार केले जात असत. दीप अमावस्येनिमित्त सोशल मीडियावर अशाच वातींची फोटो व नावासकट माहिती मिळाली. ती पुढे देत आहे. या अधिक मासात आपणही मागच्या पिढीकडून त्यापैकी जमतील तशी वात करण्याचा प्रयत्न करू आणि आपला हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करू.
अधिकमासाच्या वाती
डावीकडून उजवीकडे
1. चक्र वाती2. वृंदावन वाती3. गोपुर वाती4. 365 धागाच्या वाती5. नवरत्न वाती6. रुद्राक्ष बाती7. लक्षदीप वाती8. कार्तिक मास 210 धाग्याच्या वाती9. पाच धाग्याच्या बिल्वपत्र वाहती10. 108 धाग्याच्या वाती
11. बिल्ले वाती12. 10 धाग्याच्या वाती13. 3 धाग्याच्या वाती14. कार्तिक मास 30 धाग्याच्या वाती15. संकष्टी चतुर्थीच्या वाती16. लक्ष्मी वाती17. 3 कळ्याच्या वाती18. 221 धाग्याच्या वाती19. अष्टदल लक्ष्मी वाती20. 5 धाग्याच्या लक्ष्मी वाती21. गदा वाती ( हनुमान )22. मोग्गु वाती23. कुच्चु वाती24. 110 धाग्याच्या वाती25. 50 धाग्याच्या वाती26. अवळा वाती27. डमरू वाती28. 500 धाग्याच्या वाती29. वेणी वाती30. काडी वाती31. मंगलारुती वाती32. कट्ट वाती33. फुल वाती.
ही माहिती वाचून पूर्वजांच्या धार्मिकतेवर, भक्तीवर व कुशलतेवर नतमस्तक झाल्याशिवाय रहाणार नाही. अभिमानास्पद!