Adhik Maas Purnima 2023: चातुर्मासातील श्रावण अधिक महिना सुरू आहे. शास्त्र आणि पुराणांमध्ये अधिक महिन्याच्या पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित केले असून, ती विशेष मानली गेली आहे. श्रावण पुरुषोत्तम मासात श्रीविष्णूंप्रमाणे महादेव शिवशंकर यांचे पूजनही अतिशय शुभ आणि पुण्य फलदायी मानले गेले आहे. पुरुषोत्तम पौर्णिमा महालक्ष्मीला समर्पित असल्याची मान्यता आहे. या दिवशी धनलक्ष्मी देवीचे पूजन अत्यंत शुभलाभदायक मानले गेले आहे. अधिक मासाची पौर्णिमा कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या... (Adhik Maas Purnima 2023 Significance)
अधिक मासातील पौर्णिमेला देवीची मनोभावे पूजा करून धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद प्राप्त करण्याची सुवर्ण संधी असल्याचे सांगितले जाते. तंत्रशास्त्रात धनलक्ष्मी पूजनासह काही उपाय सांगण्यात आले आहेत. ते उपाय कर्जमुक्ती, भौतिक सुख-सुविधा, कौटुंबित शांतता, समृद्धी कारक मानले गेले आहे. तसेच पुरुषोत्तम पौर्णिमेला केलेल्या धनलक्ष्मी पूजनामुळे देवीचे शुभाशिर्वाद कायम राहतात. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही, असे म्हटले जाते. (Adhik Maas Purnima 2023 Date And Shubh Muhurat)
अधिक मास पौर्णिमा: ०१ ऑगस्ट २०२३
अधिक मास पौर्णिमा प्रारंभ: सोमवार, ३१ जुलै २०२३ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून ५१ मिनिटे.
अधिक मास पौर्णिमा सांगता: मंगळवार, ०१ ऑगस्ट २०२३ रोजी उत्तररात्रौ १२ वाजून ०१ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे मंगळवारी, ०१ ऑगस्ट २०२३ रोजी पुरुषोत्तम पौर्णिमा व्रताचरण करावे, असे सांगितले जाते. अधिक महिन्याच्या पौर्णिमेला सकाळी आणि सायंकाळी धनलक्ष्मी देवीचे पूजन, आरती, नामस्मरण करावे. धनलक्ष्मी पूजनात कमळ आणि गुलाबांच्या फुलांचा आवर्जुन वापर करावा. पुरुषोत्तम पौर्णिमेला धनलक्ष्मी पूजनासह काही स्तोत्रांचे पठण अत्यंत उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते. धनलक्ष्मी पूजनानंतर लक्ष्मी स्तोत्र किंवा कनक धारा स्तोत्र पठण करावे, असे सांगितले जाते. (Adhik Maas Purnima 2023 Vrat Puja Vidhi)
धनलक्ष्मीच्या मंत्राचा करा यथाशक्ती जप
अधिक महिन्यातील पौर्णिमेला धनलक्ष्मी पूजनानंतर काही मंत्रांचा जप अतिशय उपयुक्त मानला जातो. पौर्णिमेच्या तिन्हीसांजेला निरशा दुधात साखर आणि तांदुळ मिसळून चंद्रदेवाला अर्पण करावे. यावेळी 'ॐ स्रां स्रीं स्रौं स: चन्द्रमासे नम:' या मंत्राचा यथाशक्ती जप करावा, असे सांगितले जाते. असे केल्याने धन-धान्य, धन-संपदा यांची कधीही कमतरता राहत नाही, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. (Adhik Maas Purnima 2023 Importance)
महालक्ष्मीचीच्या प्रतिकाची स्थापना अन् भाग्याची भक्कम साथ
पुरुषोत्तम पौर्णिमेला धनलक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना करण्यासह सुवासिनी महिलेला सौभाग्याच्या वस्तू भेटवस्तू म्हणून द्याव्यात. सुवासिनी महिला मातास्वरुप मानल्या जातात. असे केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते. भाग्याची भक्कम साथ मिळण्यास सुरुवात होते. लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात. वैवाहिक जीवन सुखकारक होते, असे सांगितले जाते. तसेच पौर्णिमेच्या दिवशी एकाक्षी नारळाची स्थापना करावी. एकाक्षी नारळ महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. याच्या पूजनाने सौभाग्याची प्राप्ती होते, असे सांगितले जाते.
नोकरी, उद्योग, व्यापार वृद्धिसाठी काय करावे?
व्यापार, व्यवसाय, उद्योग, नोकरी या क्षेत्रातील व्यक्तींना मानसिक तणावाला वारंवार सामोरे जावे लागत असल्यास अधिक महिन्याच्या पौर्णिमेला खिरीत केशर मिसळून त्याचा नैवेद्य लक्ष्मी देवीला अर्पण करावा. यानंतर या खिरीचा प्रसाद कुटुंबातील ज्येष्ठ महिला आणि गरजूंना द्यावा. व्यापार, व्यवसाय, उद्योग गतिमान होऊन वृद्धी-विस्तार होण्यास उपयुक्त संधी उपलब्ध होतात. सदर उपाय समृद्धी, ऐश्वर्य, वैभव कारक मानला गेल्याचे सांगितले गेले आहे.