शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
8
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
9
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
10
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

ऐलमा पैलमा गणेश देवा... म्हणत वॉशिंग्टनमध्ये रंगला भोंडला; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 6:14 PM

मराठी माणसांबरोबर मराठी संस्कृती साता समुद्रापार पोहोचली आणि वृद्धिंगतही झाली, त्याचेच एक उदाहरण म्हणजे अमेरिकेत रंगलेला भोंडला!

नवरात्रीमध्ये घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत दररोज संध्याकाळी सर्व वयोगटातील बायका मुलींना एकत्र आणणारा खेळ म्हणजे भोंडला. महाराष्ट्रमध्ये काही ठिकाणी यालाच हादगा तर काही ठिकाणी भुलाबाई म्हणतात. नवरात्रामध्ये हस्त नक्षत्र चालूअसते आणि हत्तीच्या सोंडेने जसे पाणी पडते त्याप्रमाणे धो धो पाऊस या दिवसांमध्ये पडतॊ म्हणून भोंडल्या दरम्यान हत्तीची पूजा होते.

आपली परंपरा जपत वॉशिंग्टन डी. सी. मेट्रो एरिया अमेरिका येथील श्री देवी कट्टा, मेरीलँड इथे भोंडला आयोजित केला होता.स्री देवी कट्टा हा मराठी महिलांना एकत्र आणणारा आणि एकमेकींना घट्ट जोडून ठेवणारा दुवा आहे.मराठी महिलांच्या विचारांच्या आदान-प्रदानातून सहयोग साधण्याचा प्रयत्न. थोडक्यात सांगायचं, तर अमेरिकेत-परदेशात राहणाऱ्या मराठी महिलांसाठी कौटुंबिक आणि व्यावसायि क जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या उपयुक्त गोष्टी, साधने, त्या संदर्भात लागणारी माहिती, असलेल्या शंका कुशंका यांचे निरसन, इत्यादी याचे मार्गदर्शन या महिला विशेष डिजिटल कट्ट्यावर केले जाते. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून वॉशिंग्टन डी. सी. मेट्रो एरियामधील मराठी मुली महिला मोठ्या प्रमाणात या भोंडल्यामध्ये सामील झाल्या होत्या. हा कार्यक्रम साईबाबा मंदिर, मेरीलँड येथे नियोजित करण्यात आला.

घटस्थापनेपासून सुरु झालेल्या भोंडल्यांमध्ये रोज नवीन नवीन गाणी म्हणत कोजागिरी पौर्णिमे पर्यन्त १६ पेक्षा जास्त गाणी म्हणायला सगळ्याजणी सगळ्या तयार असतात. स्त्री देवी कट्टा मधील मराठी साज लेवून नटून थाटून आलेल्या उत्साही तरुणींनी ‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करी तुझी सेवा ........’ ' एक लिंबू झेलूबाई दोन लिंबू झेलू…..'' कारल्याचा वेल….'' आड बाई अडोणी…. आमचा भोंडला संपला…अशी १६ हुन अधिक गाणी म्हणून भोंडल्याचा आनंद घेतला. भोंडला म्हटलं की शेवटी खिरापत ओळखणे हा अतिशय गमतीदार भाग आलाच. कार्यक्रमामध्ये बाळगोपालांनी चतुरपणे समोसा, कपकेक, बटाटेवडा, दडपेपोहे, भेळ असेपदार्थ ओळखले. कमळ फुलाचेकाप, अळीव लाडू आणि रव्याचा केक असे ओळखायला थोडे कठीण पदार्थही महिलांनी ओळखले.अतिशय रुचकर खिरापतीचा सगळ्यांनी पोटभरून आनंद घेतला. कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी भोंडला असल्याने मस्त आटवलेले आणि खूप सारा सुकामेवा असलेले केशरयुक्त दूध म्हणजे उपस्थितांसाठी पर्वणीच होती.

स्त्री देवी कट्टा मेरीलँड येथे सातत्याने नवीन नवीन उपक्रम आणि कार्यक्रम होऊ घातलेआहेत. यावर्षी ही १) मराठी नाटक - अश्रूंची झाली फुले- कलाकारांबरोबर गप्पा गोष्टी कार्यक्रम २) कट्टा मीठा बोल - मराठी कलाकार प्राजक्ता माळी मुलाखत आणि गप्पा ३) झंकार Where east meets west - श्रुती भावे यांचा व्हायोलिन कार्यक्रम ४) स्री देवी कट्टा वार्षि क सहल ५) क्लासिक अन्वाइन्ड - Classic Unwind - गाण्याचा कार्यक्रम ५) भोंडला असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आता दिवाळी आणि खूप सारे परंपरा जपणारे उपक्रम नियोजित केलेलेआहेत.

सातासमुद्रापार राहणाऱ्या मराठी महिला आणि कुटुंबीयांसाठी हे सर्व कार्यक्रम म्हणजे आपल्या संकृतीची अनुभूती आणि नवीन पिढीला आपल्या परंपरांची ओळख आहे. प्रिया जोशी यांनी २०१६ मध्ये अमेरिकेमध्ये राहणाऱ्या मराठी महिलांना आपली संस्कृती परंपरांचा वारसा जपण्यास, पुढे नेण्यास आणि वृद्धिंगत करण्यासाठी स्त्री देवी कट्टा ची सुरवात केली. गेली ६ वर्ष हे काम अथकपणे सुरु आहे.  यंदाही भोंडल्याच्या निमित्ताने सगळ्यांनी अमेरिकेत राहून महाराष्ट्रीय सणाचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा आनंद लुटला. 

लेखिका- प्रणाली बाबर संपादिका- प्रिया जोशी ९ ऑक्टोबर २०२२वॉशिंग्टन डी. सी. मेट्रोएरिया, अमेरिका