अक्षय्य तृतीयेचा दिवस केवळ खरेदी आणि शुभ कार्यासाठीच नाही तर दानासाठीही खूप खास आहे. या दिवशी केलेले दान अनेक पटींनी अधिक फळ देते, त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान अवश्य करा.
आज ३ मे रोजी अक्षय्य तृतीया हा सण साजरा होत आहे. विवाह, गृहप्रवेश, नवीन कार्य सुरू करण्यासाठी आणि सोने-चांदी आणि कार खरेदीसाठी हा शुभ काळ आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी स्नान आणि दान करण्याचेही खूप महत्त्व आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ असल्याचे सांगितले आहे.
पुराणातील उल्लेख : महादानाचे महत्त्व स्कंद पुराणातील प्रभाखंडात सांगितले आहे. यानुसार गाय, सोने, चांदी, रत्न, तीळ, वस्त्र, जमीन, गादी, अन्न, दूध तसेच इतर आवश्यक वस्तू दान करणे खूप शुभ सांगितले आहे. आणि गरुड पुराणात असे म्हटले आहे की जी व्यक्ती दान करत नाही ती गरीब होतो. त्यामुळे तुमचे जे काही उत्पन्न आहे, त्यातील काही भाग नक्कीच दान करा. जितके द्याल त्याच्या दुप्पट मिळेल!
दान कधी करावे? धार्मिक ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की, काही दान असे आहे, ज्याचे फळ या जन्मात मिळते, तर काही दानाचे फळ पुढील जन्मात मिळते. तसेच ठराविक दिवशी केलेल्या दानाचे फळ सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने जास्त मिळते. अक्षय्य तृतीया देखील असाच एक दिवस आहे. या दिवशी केलेले दान १० पट अधिक फळ देते. या दिवशी जव, गूळ, हरभरा, तूप, मीठ, तीळ, काकडी, आंबा, मैदा, कडधान्य, कपडे, पाण्याची भांडी दान करणे खूप शुभ असते. हे दान कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत करतात आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीत यशाची वाट सुकर करतात.