शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

रामायण काळात कुंभकर्ण शापमुक्त झाला, तरी आजही त्याचा अंश शिल्लक आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 7:00 AM

कुंभकर्ण आपल्याला फक्त झोपेसाठी माहित आहे, परंतु तो अतिशय पराक्रमी होता. मात्र आळसामुळे त्याच्या पराक्रमाच्या कथा झाकोळल्या गेल्या!

झोपाळू माणसाला आपण कुंभकर्ण म्हणतो. त्यामागचा इतिहास मनोरंजक आहे. कुंभकर्ण हा रावणाचा धाकटा भाऊ. तो जन्मत:च महाकाय होता. पर्वतासारख्या शरीराच्या कुंभकर्णाने जन्म होताच एक हजार राक्षसांना खाल्ले. इंद्र ऐरावतावर बसून याच्या अंगावर फिरला, त्याला वज्राने मारले तरी कुंभकर्णाला काही झाले नाही. उलट त्याने ऐरावताचा एक दात उपटला. तेव्हा इंद्र पळून गेला. आणि ब्रह्मदेवाला आपली रक्षा करण्याची विनंती केली. ब्रह्मदेव म्हणाले, `इंद्रदेवा, कुंभकर्णाचा उपद्रव वाढला आहे, त्याला शांत ठेवण्याचा पर्याय म्हणजे त्याला निद्राधीन करणे. त्याच्या दुष्कृत्याचे फळ म्हणून मी त्याला कायम झोपलेला राहशील, असा शाप देतो.'

रावणाला हे समजताच त्याने ब्रह्मदेवाची स्तुती केली आणि आपल्या भावाला उ:शाप देण्याची विनंती केली. परंतु, कुंभकर्णाचे प्रताप पाहता, त्याला सहा महिन्यांनी एकदाच जाग येईल, असा ब्रह्मदेवांनी उ:शाप दिला. त्यानुसार सहा महिन्यांनी एकदा कुंभकर्णाला जाग येऊ लागली. तो एक दिवस कुंभकर्ण मौज मजेत, आनंद, विलास, मदिरापान, नृत्य गायन ऐकण्यात घालवित असे.

हनुमंत सीतेला नेण्यासाठी लंकेत आले, तेव्हा योगायोगाने कुंभकर्ण जागा होता. हनुमंताचे प्रताप, रामचंद्रांचे सामर्थ्य, सीतेचे अपहरण आणि रावणाचे दुष्कृत्य कळल्यावर कुंभकर्णानेदेखील रावणाला सीतेला परत देण्याचा सल्ला दिला होता. परंतु, रावणाने त्याचे ऐकले नाही. कुंभकर्ण सवयीप्रमाणे झोपून गेला. 

राम आणि रावणाचे घनघोर युद्ध सुरू झाले, तेव्हा रथी-महारथी रणांगणावर प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. युद्धात दोन्ही बाजूच्या वीरांना वीरमरण येत होते. आपल्याकडचे एक एक योद्धा कमी होत असल्याचे पाहून रावणाने कुंभकर्णाला उठवायचे ठरवले. 

कुंभकर्णाला उठवणे सोपे काम नव्हते. बलाढ्य शरीराच्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी सैनिक जवळ गेले असता, त्याच्या श्वासोच्छासाने उडून धारातिर्थी पडत असत. त्याचे घोरणे ऐकून सैनिकांना कानठळ्या बसत असत. राक्षसांनी कुंभकर्णाच्या अंगावरून हत्ती फिरवले. रणगाडे वाजवले. तोफा झाडल्या. तरी कुंभकर्णाला जाग येईना. 

अखेर कुंभकर्णाची झोपमोड झाली. तो खूप चिडला. रागाराागात रावणाची भेट घेतली. कुंभकर्णाने पुन्हा एकदा सीतेला परत पाठववण्याचा सल्ला दिला. परंतु, रावणाला तो सल्ला रूचला नाही. अखेर भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंभकर्ण युद्धभूमीवर उतरला. 

या विशाल देहाशी युद्ध करण्यासाठी प्रतिस्पर्धीदेखील तसाच हवा. म्हणून मारुतीररायाने महाकाय रूप धारण केले आणि कुंभकर्णाशी युद्ध केले. एका क्षणी तो धारातिर्थी पडला. त्याने प्रभू रामचंद्रांना शेवटचा नमस्कार केला. अशा रितीने कुंभकर्ण शापमुक्त आणि भवसागरातूनही मुक्त झाला. परंतु, आपल्यातला कुंभकर्ण अजुनही शिल्लक आहे. जो कठीण प्रसंगातही अजगरासारखा सुस्त पडून आहे. त्याला आता जागे करण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :ramayanरामायण