शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
2
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
3
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
4
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
5
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
7
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
9
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
10
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
11
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
12
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
13
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
14
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
15
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
16
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल
17
२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18
गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
19
IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...
20
आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा

Amalaki Ekadashi 2023: आजच्या आमलकी एकादशीचे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घेऊया!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 2:36 PM

Amalaki Ekadashi 2023: हिंदू संस्कृतीत सर्व सण, उत्सव ऋतुमानाशी आपली नाळ जोडतात, आमलकी एकादशीदेखील त्याचाच एक भाग, कसा ते पहा!

फाल्गुन मास हा वसंताचा आणि सोबतच उन्हाळ्याचा. चैत्रपालवी आलेली येते, सृष्टी आपले रूप पालटत असते. हा निसर्गसोहळा पाहण्यासाठी या व्रतांचे आयोजन केले आहे. अन्यथा रोजच्या धावपळीतून निसर्गाकडे निरखून बघायला इथे वेळ कोणाला आहे? सूर्य, चंद्र, तारे रोज येतात आणि जातात, फुलं उमलतात कोमजतात, आपण किती वेळ त्यांच्याकडे तल्लीनतेने पाहतो? नाही पाहत ना? म्हणून या व्रत वैकल्यांच्या निमित्ताने निसर्गाच्या अधिक जवळ जावे, निसर्गाचा आस्वाद घ्यावा, तजेला घ्यावा आणि नव्या उमेदीने आयुष्यात मार्गक्रमणा करावी, हा मूळ उद्देश असतो. 

आमलकी एकादशी ही तिथी आवळा एकादशी म्हणूनही ओळखली जाते. फाल्गुन मासात शुक्ल पक्ष एकादशीला आमलकी एकादशीचे व्रत केले जाते. या तिथीला आवळा एकादशी असेही म्हटले जाते.आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णूंचे वास्तव्य असते. या वृक्षाच्या प्रत्येक अंशात भगवंताचे वास्तव्य असते. या दिवशी आवळ्याचा वापर आणि आवळ्याच्या वृक्षाची यथासांग पूजा केली असता, भगवान विष्णू प्रसन्न होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्रद्धेने का होईना, लोकांचा निसर्गाशी संबंध यावा, यासाठी सण वारांचे नाते भगवंताशी जोडले आहे. यामुळे देवाचे आणि पर्यायाने निसर्गाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. 

वैज्ञानिकदृष्ट्या या तिथीचे महत्त्व लक्षात घेतले, तर रोगनिवारणाची बाब तर्कशुद्ध वाटते. आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे. आवळा हा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. यामध्ये शोधनाचा गुण असल्याने रक्तात साचलेली विषद्रव्ये दूर करून रक्त शुद्ध करतो. अशाच प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. या त्याच्या गुणांमुळेच शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. ताजा आवळा उपलब्ध नसेल तर वाळलेल्या आवळ्याची पूड म्हणजेच आवळा चूर्ण औषधामध्ये वापरावे. आवळा चूर्णमध्येही ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. आवळा सेवनाचे हे फायदे, तर आवळ्याच्या शितल छायेत विसावा घेतला, तर कितीतरी फायदे होतील. 

यासाठी व्रताच्या निमित्ताने आपणही आवळ्याच्या वृक्षाचा शोध घेऊन त्याचे सान्निध्य अनुभवूया आणि आपले रोगनिवारण व्हावे, यासाठी प्रतिदिन आवळासेवन करूया. आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली, तरच सुदृढ शरीराने आणि सुदृढ मनाने ईश्वराने सोपवलेल्या कामाची पूर्ती करू शकू आणि ईश्वरकृपादेखील प्राप्त करू शकू.