शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

ब्रह्मदेवाच्या अश्रूंपासून झाली आवळ्याची निर्मिती; आमलकी एकादशीनिमित्त वाचा आवळ्याचे  महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 8:00 AM

आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शितलता आपल्या आयुष्यात यावी, म्हणून लेखात दिलेली प्रार्थना करावी. 

आज आमलकी एकादशी. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर आवळ्याच्या वृक्षावर येऊन वास करतात, म्हणून आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते. तसेच, पूजा झाल्यावर आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत बसून फलाहार केला जातो. निसर्गाच्या जवळ नेणारा आणि अक्षय आनंद देणारा हा दिवस आमलकी एकादशी म्हणून ओळखला जातो. 

आमलकी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करावे. आवळ्याच्या झाडाची पूजा करावी. आवळ्याला धात्री वृक्ष असेही म्हणतात. म्हणून पुजेच्या वेळी  'ओम धात्र्ये नम:' असा मंत्र म्हणावा. आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शितलता आपल्या आयुष्यात यावी, म्हणून प्रार्थना करावी. 

आपल्या आसपासच्या परिसरात परदेशी झाडांची एवढी गर्दी झाली आहे, की देशी झाड शोधूनही सापडत नाही. म्हणून अशा उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या झाडांची लागवड करावी. त्यांचे पालन पोषण करावे. आवळे नवमीच्या निमित्तानेही आवळ्याचे बीज रोवता येईल. त्या वृक्षाचा विस्तार लक्षात घेऊन झाड लावावे आणि त्याचा निगराणीदेखील करावी. यथासांग पूजा झाल्यावर आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा मारावी आणि दिवेलागण करून, नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण करावी. 

देवी लक्ष्मीने आवळ्याच्या वृक्षाझाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती. तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू आणि भगवान महेश यांनी तिला दर्शन दिले. तेव्हापासून आवळा वृक्षाचे महत्त्व अधिक वाढले. 

आयुर्वेदात आवळ्याला अतिशय महत्त्व आहे. ते एक अमृत फळ आहे. अनेक आजारांवर गुणकारी आहे. त्यात मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व असते. विशेषत: हिवाळ्यात शक्तीवर्धनासाठी आवळ्याचे सरबत, मोरावळा, लोणचे, कँडी खाल्ली जाते. पचनक्रिया उत्तम होण्यासाठी जेवणानंतर रोज आवळा कँडी खावी. प्रवासात मळमळत, गरगरत असेल किंवा तापात तोंडाची चव गेली असेल, तर आवळा सुपारी योग्यप्रकारे काम करते. केसगळतीवर आवळा तेल रामबाण उपाय म्हणून वापरला जातो. आवळ्याची आंबट, तुरट चव आणि त्याचा रसरशीतपणा, हिरवा पोपटी रंग सर्वांना आकर्षून घेतो. 

जेव्हा संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली बुडाली आणि पृथ्वीवर जीवनच नव्हते, तेव्हा ब्रह्मदेव कमळाच्या फुलात बसून निराकार परब्रह्माची तपश्चर्या करीत होते. त्यावेळी ब्रह्माजींच्या डोळ्यातून ईश्वरीय भक्तीचे अश्रू गळत होते. या अश्रूंपासूनच आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली, असे म्हटले जाते.

वड, पिंपळ, बेल, अशोक आणि आवळा या वृक्षांना 'वृक्ष पंचवटी' म्हटले जाते.  लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, सर्व वयोगटासाठी आवळा गुणकारक आहे, बलवर्धक आहे. त्याची पूजा करणे आणि त्याच्या वृक्षाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हाच आमलकी एकादशीचा हेतू आहे!