शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात, आठवडाभरात दुसऱ्यांदा झाले दाखल
2
"आदिवासी नेत्याला CM पदावरून हटवणे अत्यंत दु:खद", हिमंता बिस्वा सरमा यांचा जेएमएम-काँग्रेसवर निशाणा
3
"मी आधीच निघून गेलो होतो, समाजकंटकांनी..."! हाथरस दुर्घटनेवर भोले बाबा यांची पहिली प्रतिक्रिया
4
18 राज्‍यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात डंका, यांच्याकडून मिळतो तब्बल 90 टक्के पैसा!
5
राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 
6
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे
7
जो बायडेन यांचा पत्ता कट? मिशेल ओबामा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
8
झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM  
9
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
10
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
11
कोल्हापूर : वर्दी परिधान करण्याअगोदरच मृत्यू; २६ वर्षीय तरूणाची चटका लावणारी एक्झिट
12
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
13
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
14
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
15
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
16
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
17
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
18
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
19
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
20
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

Anagaraki Chaturthi 2024: अंगारकीच्या मुहूर्तावर दुर्वांचा तोडगा सुरू करा; बाप्पा इच्छापूर्ती करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 3:56 PM

Angaraki Sankashti Chaturthi 2024: २५ जून रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे, या मुहूर्तावर सुरू केलेली दूर्वा उपासना निश्चितच लाभदायी ठरेल.

मंगळवार , २५ जून रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक प्रार्थना करतात. तसेच उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात. तसेच बाप्पाच्या आवडत्या वस्तू, पदार्थ अर्पण केल्या जातात. या सर्व उपचारामुळे बाप्पा प्रसन्न होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि अनुभवदेखील आहे. त्या उपायाबद्दल जाणून घेऊया.  

बाप्पाच्या आवडत्या दुर्वांशिवाय गणेश पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून जेव्हा जेव्हा गृहप्रवेश, मुंज, विवाह इत्यादी शुभ कार्य केली जातात तेव्हा गणेश पूजेला दुर्वा वापरल्या जातात. याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजेतही दुर्वा वापरतात. या दिवशी दुर्वाचे काही उपाय खूप चमत्कारिक ठरतात. चला जाणून घेऊया या चमत्कारिक उपायांबद्दल.

उपाय जाणून घेण्याआधी दुर्वा वाहण्याबद्दल थोडेसे: गणेश पूजेत दुर्वा, विष्णू पूजेत तसेच सत्य नारायण पूजेत तुळशी दल, शंकराला बिल्व पत्राचा अभिषेक कशासाठी? तर त्यानिमित्ताने पूजेत आपले लक्ष केंद्रित व्हावे आणि मन स्थिर व्हावे. आपण गवताला दुर्वा म्हणत नाही, तर गवतातून निवडलेल्या त्रिदलाला दुर्वा म्हणतो आणि त्या बाप्पाला अर्पण करतो. याचाच अर्थ हे काम अतिशय मन लावून करायचे आहे. मन एकदा का शांत आणि एकाग्र झाले की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि चमत्कारही आपोआप घडतात. यासाठीच हे पुढील उपाय... 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वापरण्याच्या पद्धती: 

- जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर पाच दूर्वामध्ये दोऱ्याला ११ गाठी  घालून तो दुर्वांचा छोटासा हार बाप्पाला अर्पण करावा. असे केल्याने आर्थिक संकटातून लवकर सुटका होते.

- आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंध कपाळाला लावा. असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.

- ज्योतिष शास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गायीला चारा तसेच दुर्वा खाऊ घाला. असे केल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेमभावना वाढते.

- गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला २१ दुर्वांचे त्रिदल अर्पण करा. त्याबरोबर अथर्व शीर्षाची २१ आवर्तने म्हणा किंवा श्रवण करा. त्यामुळेदेखील गणेशकृपा प्राप्त होते. 

- गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही. उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धन प्राप्त होते, असे मानले जाते.

- बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात ११ दुर्वांच्या जुडी अर्पण केल्याने बुध दोष दूर होतो आणि गणेश कृपा होते.  

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३ganpatiगणपती