शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

Anant Chaturdashi 2024: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा व्यंकटेश स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:39 PM

Anant Chaturdashi 2024: व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव अनेक भाविकांनी घेतला आहे; तुम्हालाही इच्छापूर्ती व्हावीशी वाटत असेल तर जाणून घ्या स्तोत्र आणि नियम!

१७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024)आहे. अनंत अर्थात भगवान विष्णूंच्या सर्वव्यापी निर्गुण निराकार शक्तीची पूजा. ही शक्ती सगुण रूपात अवतरली ती विष्णूंच्या दहा अवतारामध्ये. तसेच पांडुरंग, बालाजी हीदेखील विष्णुरूप मानली जातात. म्हणून अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची अर्थात विष्णूंची पूजा करून पांडुरंगाष्टक, विष्णूसहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे असे सांगितले जाते. पैकी व्यंकटेश स्तोत्राची माहिती देणारा एक निनामी लेख वाचनात आला. अनेकांना त्या व्रताचा उपयोगही झाला असे म्हटले होते. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे व्रत जरूर अंगिकारावे, ज्यांना नियम पाळणे शक्य नाही, त्यांनी निदान तिन्ही सांजेला व्यंकटेश स्तोत्र अवश्य म्हणावे. 

 १) एक मंडल म्हणजे २१ वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे. 

२) हे स्तोत्र २१ दिवस (कोणताही दिवस, वार, पक्ष चालतो), रोज अर्धरात्री १२.०० वाजता (शुचिर्भुत होउन), म्हणायला सुरुवात करावी, संपवावे आपल्या गतीने, हरकत नाही, पण सुरु मात्र ठीक १२ वाजता रात्री करावं.  

Anant Chaturdashi 2024: अनंत चतुर्दशीला अनंताचा धागा बांधल्याने होतात अगणिक फायदे!

३) ह्या २१ दिवसांत ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या . काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार्-वर्तन्-वचन, कोणावर अन्याय.करणे टाळावे.  

४) रोज रात्री हे स्तोत्र म्हणतांना पूर्वेकडे तोंड करुन निळ्या, आसनावर मांडी घालुन बसावं . 

५) एकाग्रतेने, इकडे-तिकडे न पाहाता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता म्हणावं अथवा वाचावं. 

६) २१दिवस पूर्ण झाल्यावर जे काही ईच्छित असेल ते पूर्ण होतेच. 

Anant Chaturdashi 2024: यश, कीर्तीप्राप्तीसाठी सलग चौदा वर्षं करावे लागते अनंताचे व्रत; वाचा व्रतविधी!

खालील गोष्टींकडे जरा लक्ष द्या : 

या सेवे मध्ये काही अज्ञात शक्ती  तुम्हाला चक्क बाधा आणतील २१ दिवस काही तुमचे पुरे होऊ देणार नाही, त्या आधीच काहितरी चुक करुन  अगदी नीट लक्ष कुठेतरी, कसातरी, कुठुनतरी हे तुम्हाला हे बाधा रहित पणे २१ दिवस पूर्ण होऊ देणार नाही. पण आपण ढळायचे नाही!! . २१ दिवस कसोटीने हे पूर्ण केल्यावर व्यंकटेशाला कुठल्या ना कुठल्या रुपांत तुम्हाला भेटायला यायचे असते. तो तुम्हीच ओळखायचा. हा जागृति, स्वप्न, सुषुप्ती ह्या कोणत्याही आपल्या अवस्थांमध्ये येऊ शकतो !! 

|| शुभं भवतु || 

ग्रहपीडा निवारण, संकटनिवारण करण्यासाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र.     श्री व्यंकटेश स्तोत्र 

व्यंकटेशो वासुदेवःप्रद्युम्नोऽमितविक्रमः।संकर्षणो अनिरुद्धश्र्च शेषाद्रिपतिरेवचः ॥१॥जनार्दनः पद्मनामो वेंकटाचलवासिनः ।सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः॥२॥गोविंदो गोपतिः कृष्णः केशवो गरुडध्वजः ।वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः ॥३॥श्रीधरः पुंडरिकाक्षः सर्वदेवस्तुतो हरीः ।श्रीनृसिंहो महासिंहः सूत्राकारः पुरातनः ॥४॥रमानाथो महाभर्ता मधुरः पुरुषोत्तमः ।चोलपुत्रप्रियः शांतो ब्रह्मादिनां वरप्रदः ॥५॥श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृद् भयनाशनः ।श्रीरामो रामभद्रश्च भवबंधैकमोचकः ॥६॥भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियःपतिः अच्युतानंद गोविंद विष्णुर्वेंकटनायकः ॥७॥सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतं ।समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः ॥८॥इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमिततेजसः ।त्रिकाले यः पठेन्नित्यं पापं तस्य न विद्यते ॥९॥राजद्वारे पठेद् घोरे संग्रामे रिपुसंकटे ।भूत-सर्प-पिशाचादि भयं नास्ति कदाचन ॥१०॥अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान्भवेत् । रोगार्ते मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बंधनात् ॥११॥यद् यदिष्टतमं लोके तत् तत् प्राप्नोत्यसंशयः ।ऐश्वर्यं राजसंन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदम् ॥१२॥विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं ।सर्वऐश्वर्यप्रदं नृणां सर्वमंगलकारकम् ॥१३॥मायावी परमानंद त्यक्त्वा वैकूठमुत्तमं ।स्वामिपुष्करिणीतीरे रमया सह मोदते ॥१४॥कल्याणाद्भूत गात्राय कामितार्थप्रदायिने ।श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः ॥१५॥

Anant Chaturdashi 2024: अनंत चतुर्दशी व्रताचा पांडवांनादेखील झाला होता भरघोस लाभ!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी