शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

Anant Chaturdashi 2024: बाप्पाला निरोप देताना सहा महिन्यांसाठी करा 'हा' संकल्प; होईल इच्छापूर्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 10:38 AM

Anant Chaturdashi 2024: अनंत चतुर्दशी मंगळवारी आल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे, बाप्पाच्या कृपेसाठी दिलेला संकल्प मनापासून करा, फळ मिळेल!

आज मंगळवार आणि अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024)अर्थात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस! पुनरागमनायच म्हणत त्याला पुढच्या वर्षी लवकर ये हे तर म्हणायचं आहेच, शिवाय त्याच्या कृपेस पात्र होण्यासाठी दिलेल्या स्तोत्राचे सलग सहा महीने त्रिकाळ पठण करायचे आहे, जेणेकरून बाप्पाच्या कृपेने आपली इच्छापूर्ती होऊ शकेल. त्यासाठी महर्षी नारद यांनी रचलेल्या संकट नाशनम स्तोत्राचे महत्त्व जाणून घेऊ. हे मूळचे संस्कृत स्तोत्र कवी श्रीधर यांनी मराठीत अनुवादित केले. त्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही, त्यांनाही हे स्तोत्र पठण करणे सोपे झाले. त्यात गणरायची बारा नावे आहेत व शेवटी स्तोत्राची फलश्रुती दिली आहे. त्यात असे म्हटले आहे, की हे प्रासादिक स्तोत्र त्रिकाळ अर्थात सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हटले तर त्याचे फळ निश्चित मिळते. आणि फळ काय तर? विद्यार्थ्याला विद्या, धनार्थ्याला धन, पुत्रार्थ्याला पुत्र आणि मोक्षार्थ्याला गती मिळते असे म्हटले आहे. 

हे स्तोत्र मनोभावे म्हटले असता सहा मासात या स्तोत्राची अनुभूती येऊ लागेल आणि वर्षभरात निश्चित फळ मिळेल असा दावा या स्तोत्राचे रचेते महर्षी नारद करतात. त्यामुळे विनायकी चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी हे सोपे सुलभ आणि फलदायी स्तोत्र पठण सुरू करावे यासाठी स्तोत्राचे शब्द पुढीलप्रमाणे.. 

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका | भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें | सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक | अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर | विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||

विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ| एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४