गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया, अशा प्रथमेश असलेल्या गणपती बाप्पाची अबालवृद्ध उपासना, आराधना, पूजा अगदी भक्तिभावाने करत असतात. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती व्रत केले जाते. यातील वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी व्रत करण्याची प्राचीन परंपरा सुरू आहे. मंगळवारी संकष्ट चतुर्थी आली की, त्यावेळी अंगारक योग जुळून येतो, असे सांगितले जाते. सन २०२१ मधील दुसरी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... (Angarki Sankashti Chaturthi 2021 Date)
तुळस एवढी पवित्र असूनही गणपती बाप्पाला व्यर्ज का? त्यामागे आहे 'ही' पौराणिक कथा!
आषाढ अंगारक संकष्ट चतुर्थी: २७ जुलै २०२१
आषाढ वद्य अंगारक चतुर्थी प्रारंभ: सोमवार, २६ जुलै २०२१ रोजी मध्यरात्री २ वाजून ५४ मिनिटे.
आषाढ वद्य अंगारक चतुर्थी समाप्ती: मंगळवार, २७ जुलै २०२१ रोजी मध्यरात्री २ वाजून २८ मिनिटे.
शास्त्रानुसार देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का करावी? त्यामुळे देवत्त्व कसे येते, वाचा
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे आषाढ महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन मंगळवार, २७ जुलै २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला 'अंगारक चतुर्थी' म्हणतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण दर महिन्यात करतो, परंतु अंगारक चतुर्थीचे महत्त्व अधिक असते कारण हा योग वारंवार येत नाही. विशेष म्हणजे चातुर्मासातील पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे. (angarki sankashti chaturthi july 2021 puja in marathi)
चातुर्मासारंभ: जीवनशैली, ऋतुचक्राशी निगडीत सात्विकतेचा आरोग्यदायी काळ
असे करावे संकष्ट चतुर्थीचे व्रत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (Angarki Sankashti Chaturthi 2021 city wise chandrodaya timing)
महाभारतानंतर पुढे काय झालं याची उत्सुकता आहे? मग ‘हे’ वाचा!
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०९ वाजून ५९ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०९ वाजून ५९ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून ५२ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०९ वाजून ५४ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ ०९ वाजून ५२ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०९ वाजून ५० मिनिट |
वर्धा | रात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०९ वाजून ३९ मिनिटे |
बीड | रात्रौ ०९ वाजून ४७ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०९ वाजून ३५ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे |
औरंगाबाद | रात्रौ ०९ वाजून ५० मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०९ वाजता ४९ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे |
उस्मानाबाद | रात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०९ वाजून ३३ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०९ वाजून ४७ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे |