शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

विनायक चतुर्थी अंगारक योग: गणेशाचे विशेष व्रतपूजन कसे करावे? पाहा, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2024 10:11 AM

Vinayak Chaturthi Angarak Yog November 2024: चातुर्मासातील शेवटच्या कार्तिक विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आले आहे. अंगारकी विनायक चतुर्थीचे महात्म्य, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या...

Kartik Vinayak Chaturthi Angarak Yog November 2024: मराठी वर्षात विशेष महात्म्य असलेला चातुर्मासाचा काळ सुरू आहे. अगदी काही दिवसांनी चातुर्मासाची सांगता होत आहे. दिवाळीनंतर प्रबोधिनी देवउठनी कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. तत्पूर्वी कार्तिक शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी होत आहे. नोव्हेंबर महिन्यातील या विनायक चतुर्थीचे विशेष म्हणजे या दिवशी अंगारक योग जुळून आला आहे. अंगारक योग म्हणजे काय? विनायक चतुर्थी अंगारक योग व्रतपूजन कसे करावे? अंगारकी विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त कोणता? जाणून घेऊया...

अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की 'माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल! अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते. 

कार्तिक महिन्यातील विनायक चतुर्थी अंगारक योग

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! प्रत्येक मराठी महिन्यातील दोन्ही चतुर्थीला गणपती पूजन, उपासना, नामस्मरण करण्याची प्राचीन परंपरा आहे. मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर वद्य पक्षातील चतुर्थी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. गणेश व्रतांमध्ये या दोन्ही चतुर्थींना गणपती पूजन करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे. 

अंगारक विनायक चतुर्थीला विशेष पूजन

गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे. विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक. गणपती समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे, असे सांगितले जाते. वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

विनायक चतुर्थी अंगारक योग: मंगळवार, ०४ नोव्हेंबर २०२४

कार्तिक शुद्ध चतुर्थी प्रारंभ: सोमवार, ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रौ ११ वाजून २३ मिनिटे.

कार्तिक शुद्ध चतुर्थी समाप्ती: मंगळवार, ०४ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रौ १२ वाजून १६ मिनिटे.

विनायक चतुर्थी अंगारक योग गणेश व्रतपूजा विधी

अंगारक विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपतीला लाडू, मोदक यांचा नैवेद्य दाखवल्यास उत्तम. गणपतीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा. शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे.

मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण, नामस्मरण करावे

अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते, अशी मान्यता आहे. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही, तर एक दुर्वा अवश्य अर्पण करावी. मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण, नामस्मरण करावे. असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.  

 

टॅग्स :chaturmasचातुर्मासganpatiगणपती 2024spiritualअध्यात्मिकPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४