शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Ashadhi Ekadashi 2021 : आषाढी एकादशीला 'महाएकादशी' का म्हणतात ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 2:35 PM

Ashadhi Ekadashi 2021: भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे. म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात.

दर महिन्यात दोन याप्रमाणे आपल्या पंचांगात वर्षभरात येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी असतात, त्यांना वेगवेगळी नावे आहेत. आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले आहे. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात हाीते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते. लाखो वारकरी त्यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात. विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते. महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते. या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता, महाएकादशी हे नाव सार्थक ठरते.

भागवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस नेहमीच शिरोधार्थ मानतो. ज्ञानोबा-तुकाराम या संतांनी धर्माचे लोण महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर हा भागवत धर्म प्राणाहून प्रिय मानतो. या भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे. म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात. आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपास हा अतिशय लाभदायक असल्याचे शास्त्रकारांचे मत आहे. परंतु उपासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन व्रत पालन करणे अयोग्य आहे. 

एकादशीच्या दिवशी तहानभूक हरपून जावी एवढे ईशचिंतन करावे, असे शास्त्र सांगते. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मित आहार करायला हरकत नाही. आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे, म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात. पुढील चार महिने वेगवेगळी पूजा, व्रत, पूजा, सण, उत्सव तसेच जपतपादि कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषवण्याचा प्रयत्न करतात.

आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यत: विठ्ठलाची पूजा करतात. पांडुरंगाच्या ठायी विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपास करतात. भजन, पूजन, कीर्तन, हरीकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम या दिवशी आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहानथोर सहभागी होतात. या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठलभक्तीचा तर नुसता सुकाळ असतो. विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जिवाचा जिवलग भेटावा असे समाधान मिळते. चंद्रभागेत स्नान करून मंडळी घरी परततात.

आषाढी एकादशीस चातुर्मासारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात. अनेक परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या, भाद्रपद महिन्यात दही व दह्याचे पदार्थ, अश्विन महिन्यात दूध व दुधाचे पदार्थ आणि कार्तिकात द्विदल धान्य म्हणजे कडधान्य व्यर्ज्य करतात. काही जण चार महिने एकभुक्त राहतात, तर काही जण सुखशय्या व्यर्ज्य करतात. काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात. नित्य देवदर्शन, कथा कीर्तन, श्रवण, पूजा, अभिषेक, नदीस्नान असे अनेक नेमधर्म आचारण्याची परंपरा आजही सर्वत्र सुरू आहे. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी