शहरं
Join us  
Trending Stories
1
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
3
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
4
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
5
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
6
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
7
दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
8
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
9
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
10
ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्... (Video)
11
महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा
12
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
13
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
14
Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया
15
पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण
16
नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत
17
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
18
जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास
19
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
20
इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले

Ashadhi Ekadashi 2023: चातुर्मासात भगवान विष्णू निद्रा घेत असूनही बहुतेक सण याच काळात का असतात? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 7:00 AM

Ashadhi Ekadashi 2023: २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे, तेव्हापासून सुरू होणाऱ्या चातुर्मासाबद्दल आणि सणांबद्दल जाणून घेऊ. 

आषाढी एकादशीपासून चतुर्मास सुरू होतो.  यंदा २९ जूनपासून चातुर्मास सुरू होणार आहे. या चार महिन्यात देव विश्रांती घेतात अशी भक्तांची श्रद्धा असते. या काळात मंगलकार्ये केली जात नाहीत. देवाच्या अनुपस्थितीत मंगलकार्ये करू नये, हा भोळा आणि सच्चा भाव त्यामागे असतो. तरीदेखील पाऊस पाणी पुरेसे आल्यामुळे सर्वत्र सुबत्ता नांदते. उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण असते. त्या उत्साहाला दिशा मिळावी म्हणून नानाविध व्रतांची आखणी चतुर्मासात केलेली दिसते. त्याची सुरुवात होते गोंविदशयन व्रतापासून...

गोविंदशयन व्रत अर्थात देवशयनी एकादशीपासून देव चार महिने झोपी जातात, म्हणून देवाची व्यवस्था लावून देणारे व्रत. आजकाल हे व्रत घरोघरी केले जात नाही, परंतु पूर्वी घरातील ज्येष्ठ मंडळी विष्णूंच्या मूर्तीला देव्हाऱ्यात छोटीशी शेज रचून निजवत असत. ज्यांना हे व्रत करणे शक्य आहे, त्यांनी आषाढी एकादशीला व्रताला आरंभ करावा. चार महिन्यांचे हे व्रत वैष्णव संप्रदायातील बरीच मंडळी वैयक्तिक रीतीनेही करतात. प्रामुख्याने ते विष्णुमंदिरात केले जाते. आषाढ शुक्ल एकादशीला पूजेतील विष्णूमूर्ती शय्येवर निजवावी. त्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चार महिने विवाह, मुंज, नवीन घरातील प्रवेश अशी कोणतीही मंगलकार्ये केली जात नाहीत.

गुजराती वैष्णव बांधवामंध्ये इतर वेळीही देवाला रात्री पडदा लावून विश्रांती देतात. या व्रतामागे केवळ भोळा भक्तीभाव आहे. आपल्याला जशी विश्रांतीची गरज असते, तशी विश्वाचा पसारा सांभाळणाऱ्या देवालाही विश्रांती मिळावी हा भाग त्यामागे असतो. यालाच गोविंदशयन व्रत म्हणतात. त्याबरोबरीने चतुर्मासात आणखीही अनेक व्रते दिलेली आहेत, त्याचा आरंभ आषाढी एकादशीपासून होतो. 

आजही चातुर्मासात बहुसंख्य मंडळी काटेकोरपणे सर्व प्रथा सांभाळताना दिसतात. वास्तविक पूर्वीच्या काळी पावसाळ्यात दळणवळणाचे सर्व मार्ग बंद होत असत. प्रवास करणे अतिशय त्रासदायक व धोकादायक ठरत असे. शिवाय आपला देश कृषिप्रधान असल्यामुळे हे चार महिने शेतीची कामे करण्याची धांदल उडत असे. त्या कामातून सवड काढून लग्नकार्याला जाणे कोणालाच शक्य होत नसे. म्हणून हे चार महिने माणसांच्या सर्व शुभकार्यांसाठी निषिद्ध ठरवले गेले. तर देवकार्यासाठी, धर्मकार्यासाठी उत्तम मानले गेले. त्यामुळे श्रावणात व्रत वैकल्ये सांगितली गेली. 

आषाढीच्या वारीनंतर प्रवास टाळण्याकडे सर्वांचा कल असला तरी घरी राहून, गावातल्या देवळात, शेजारीपाजारी व्रत, सण, उत्सव साजरे करणे सोयीचे असल्याने नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, बैलपोळा, पिठोरी अमावस्या हे सारे सणवार हौसेने केले जाऊ लागले. गणपतीच्या आगमनाच्या काळी नांगरणी, पेरणी ही मुख्य कामे पूर्ण झालेली असतात. पाऊसपाणी चांगले झाल्याने सणाला उत्सवाचे रूप येते. या साऱ्या गोष्टींचा विचार करून धर्माची आपल्या जीवनाशी, व्रत वैकल्यांशी घातलेली सांगड मन थक्क करणारी तसेच आनंददायी, अभिमानास्पद आहे, यात शंका नाही.