शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

Ashadhi Ekadashi 2024: चातुर्मासात विष्णूंची 'ही' सोळा नावं, करतील तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 1:40 PM

Ashadhi Ekadashi 2024: चातुर्मासात केलेली संकल्पपूर्ती अनेक प्रकारचे लाभ मिळवून देते; त्यासाठी हा सोपा उपाय सलग चार महिने सकाळी अवश्य करा!

यंदा १७ जुलै रोजी आषाढी एकादशी पासून चातुर्मास सुरू होत आहे, तो कार्तिकी एकादशीला समाप्त होईल. चातुर्मासात काही ना काही संकल्प करण्याचा प्रघात आहे. कारण संकल्पपूर्तीसाठी थोडा थोडका नाही तर चार महिन्यांचा कालावधी मिळतो. यात पुण्यसंचय व्हावा या हेतूने दान, धर्म, उपासना केली जाते. चातुर्मासात विष्णुसहस्त्रनाम रोज म्हटल्याने वा ऐकल्याने पुष्कळ लाभ होतो हा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. परंतु अनेकांना तेवढा वेळ काढणे शक्य होत नाही. कारण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायला पाऊण तास आणि ऐकायला अर्धा तास तरी लागतोच. अशा वेळी इच्छा असूनही उपासना करता येत नाही. त्यावर सुंदर पर्याय म्हणजे विष्णू षोडश नाम स्तोत्र! या स्तोत्राचा भावार्थ एकदा वाचलात तरी स्तोत्र महात्म्य लक्षात येईल! विष्णूसहस्त्र नामावलीत विष्णूंची १००० नावे आहेत, ती घेता आली नाहीत तर निदान पुढील स्तोत्रात दिलेली सोळा नावं आवर्जून रोज म्हणावीत! कारण, विष्णू षोडशनाम स्तोत्र विष्णू सहस्त्र नामाइतकेच प्रभावी आहे आणि संकटमुक्त करून सर्व सुखाची प्राप्ती करून देणारे आहे; सविस्तर वाचा!

औषधे चिंतये विष्णुम भोजने च जनार्धनम,शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिम,युद्धे चक्रधरम देवं प्रवासे च त्रिविक्रमं,नारायणं तनु त्यागे श्रीधरं प्रिय संगमे,दुःस्वप्ने स्मर गोविन्दम संकटे मधुसूधनम,कानने नारासिम्हम च पावके जलाशयिनाम,जलमध्ये वराहम च पर्वते रघु नन्दनं,गमने वामनं चैव सर्व कार्येशु माधवं।षोडशैतानी नमानी प्रातरुत्थाय यह पठेत,सर्वपापा विर्निमुक्तो विष्णुलोके महीयते।

अर्थ : शरीर आजारी असताना, औषध घेताना भगवान विष्णूचे ध्यान करावे, अन्न खाताना त्यांच्या जनार्दन रूपाचे ध्यान करावे, झोपताना त्यांच्या पद्मनाभ रूपाचे ध्यान करावे, विवाहाच्या वेळी त्यांच्या प्रजापती रूपाचे ध्यान करावे, युद्धाला जाताना, त्याच्या चक्रधारी स्वरूपाचे ध्यान करावे, प्रवास करताना त्यांच्या त्रिविक्रम स्वरूपाचे ध्यान करावे. मृत्यूसमयी त्यांच्या नारायण रूपाचे ध्यान करावे, संसारसुखाच्या वेळी त्यांच्या श्रीधर रूपाचे ध्यान करावे, दुःस्वप्नांच्या वेळी त्यांच्या गोविंद  रूपाचे ध्यान करावे आणि संकटसमयी त्यांच्या मधुसूदन रूपाचे ध्यान करावे. वादळाच्या वेळी त्याच्या नरसिंह रूपाचे ध्यान करावे, आगीच्या वेळी समुद्रात त्याच्या निद्रिस्त रूपाचे ध्यान करावे, पाण्यात अडकल्यावर त्याच्या वराह स्वरूपाचे ध्यान करावे, पर्वत आणि जंगलात, भटकताना त्याच्या रघुनंदन रूपाचे ध्यान करावे. जर तुम्ही त्यांच्या वामन स्वरूपाचे ध्यान केले तर सर्व कार्य करताना त्यांच्या माधव स्वरूपाचे ध्यान करावे.

जे भक्त सकाळी उठून या सोळा नामांचा उच्चार करतात, त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि विष्णूच्या जगात स्थान मिळते. असा या स्तोत्र पठणाचा महिमा आहे. 

त्यामुळे यंदा चातुर्मासात दर दिवशी सकाळी न चुकता हे छोटंसं स्तोत्र म्हणा आणि मोठे लाभ अर्थात सर्वांगीण लाभ मिळवा. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३