शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

अश्विन दाशरथी संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा गणेशपूजन, मिळेल व्रताचे पुण्यफल; पाहा, चंद्रोदय वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 7:00 AM

Ashwin Sankashti Chaturthi 2023: चातुर्मासातील शेवटची अश्विन संकष्ट चतुर्थी असून, याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. चंद्रोदयाची वेळ काय? जाणून घ्या...

Ashwin Sankashti Chaturthi 2023: प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. चातुर्मास सुरू असून, अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी अनेकार्थाने विशेष मानली जाते. अश्विन संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, मान्यता, प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घेऊया... (Ashwin Sankashti Chaturthi 2023 Date And Time)

संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हनात अर्घ्य द्यावे. नंतर गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून उपास सोडावा. उपास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. हे एक काम्यव्रत आहे. काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही ईच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. (Ashwin Sankashti Chaturthi 2023 Significance)

दाशरथी करक चतुर्थी

अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्थी दाशरथी चतुर्थी आणि करक चतुर्थी या नावानेही ओळखली जाते. दाशरथी चतुर्थीला दशरथ राजाचे स्मरण करून व्रत केले जाते. तर उत्तर भारतात या दिवशी करवा चौथ व्रत करण्याची परंपरा आहे. करवा चौथ व्रताला अतिशय महत्त्व असून, ते मोठ्या प्रमाणावर केले जाते. याच दिवशी संकष्ट चतुर्थी असल्याचे त्याचे महत्त्वही वाढले आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. अश्विन महिन्याची संकष्ट चतुर्थी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. यानंतर कार्तिक महिन्यातील एकादशीला चातुर्मासाची सांगता होत आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी येत आहेत. पहिली अश्विन संकष्ट चतुर्थी, ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी असून, दुसरी कार्तिक संकष्ट चतुर्थी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी आहे. (Ashwin Sankashti Chaturthi 2023 Vrat Puja Vidhi In Marathi) 

अश्विन संकष्ट चतुर्थी: बुधवार, ०१ नोव्हेंबर, २०२३

अश्विन संकष्ट चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे.

अश्विन संकष्ट चतुर्थी समाप्ती: बुधवार, ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे.

‘असे’ करा गणेशपूजन, मिळेल व्रताचे पुण्यफल

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे
ठाणेरात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे
पुणेरात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे
सातारारात्रौ ०८ वाजून ५५ मिनिटे
नाशिकरात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
अहमदनगररात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे
धुळेरात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे
जळगावरात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे
वर्धारात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून ३१ मिनिटे
बीडरात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे
सांगलीरात्रौ ०८ वाजून ५५ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे
सोलापूररात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून २५ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून ३१ मिनिटे
अकोलारात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे
भुसावळरात्रौ ०८ वाजता ३९ मिनिटे
परभणीरात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून २३ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०८ वाजून ३९ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
बेळगावरात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
इंदौररात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे

 

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती