सद्यस्थिती अशी आहे की आपण सगळेच जण नकारात्मकतेच्या सावटाखाली आहोत. रोजचा कामाचा ताण, वाढत्या जबाबदाऱ्या, इतरांशी अकारण ओढवून घेतलेली स्पर्धा, घरातले कलह यामुळे मानसिकरीत्या आजारी पडत आहोत. यावर ध्यानधारणा, औषधोपचार, व्यायाम, आहार, विहार इ. पर्याय आहेतच, त्यालाच ज्योतिष शास्त्राने जोड दिली आहे, एका साध्या, सोप्या आणि बिनखर्चिक उपायाची! चला जाणून घेऊया तो उपाय!
शीर्षकात लिहिल्यानुसार एक ग्लास पाण्यामध्ये आपण आपल्या आयुष्यातली नकारात्मकता संपवू शकतो. अनेकांनी या प्रयोगाचा अनुभव घेतला आहे आणि ते तणावमुक्त जीवन जगत आहेत. तुम्हालाही तो प्रयोग करून पाहता येईल. तोही घरच्या घरी!
>> यासाठी एक पेला घ्यावा, पारदर्शक अर्थात काचेचा असल्यास उत्तम! परंतु घरात लहान मुले असल्यास साधा पेला वापरला तरी चालू शकेल.
>> त्या पेल्यात पाणी भरून घ्या.
>> रोज रात्री झोपण्यापूर्वी पाण्याचा पेला हातात घेऊन दिवस भरातील माझी सगळी नकारात्मकता तू शोषून घे हे विनम्रपणे पाण्याला सांगा.
>> तो पेला डोक्याजवळ एखाद्या टेबल, स्टुलावर ठेवून द्या.
>> सकाळी उठल्यावर ते पाणी कुंडीत किंवा मोरीत टाकून द्या.
>> सलग सात दिवस हा प्रयोग करून बघा, तुम्हाला बदल जाणवेल असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे.
>> यानंतरही हा प्रयोग सातत्याने सुरू ठेवला तरी काहीही बिघडणार नाही.
हा प्रयोग वाचून कदाचित हसू आले असेल, पाण्याशी कोण बोलतं का? पण पाण्याला आपण जीवन म्हणतो. तो पंचमहाभूतांपैकी एक घटक आहे. त्याची ताकद अनुभवल्याशिवाय लक्षात येणार नाही. ज्याप्रमाणे अथांग समुद्र, कोसळणारा धबधबा आणि झूळूझुळू वाहणारी नदी पाहिली की प्रसन्न वाटतं आणि पेलाभर पाणी प्यायलावर हायसं वाटतं, त्याचप्रमाणे पेलाभर पाण्यात आपल्याला सकारात्मकता देण्याची शक्त्ती असूच शकते, नाही का?