लसूण हा आपल्या आहाराचा एक घटक आहे. त्याच्या वापरामुळे जेवणाची लज्जत वाढते.आरोग्यही उत्तम राहते. म्हणून आयुर्वेदातही त्याचा समावेश आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की लसूणाचे तोडगे तुमचे वैयक्तिक आयुष्यदेखील यश प्राप्तीस हातभार लावतात. आर्थिक प्रश्न सोडवतात. त्यासाठी हे तोडगे कसे वापरायचे ते जाणून घेऊया.
आर्थिक स्थिती सुधारेल:
जर कुटुंबात सतत भांडणं होत असतील किंवा पती-पत्नीमध्ये काही मतभेद असतील तर. ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त आहात, तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लसणाच्या सात कळ्या एका काडीत अडकवून घराच्या छतावर ठेवा किंवा खिडकीबाहेर ठेवा. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होईल. घरातील कलह कमी झाल्यामुळे शांतता राहील. कुटूंबातील सदस्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास होईल आणि घराकडे पैशांचा ओघ वाढेल. घरातील कलह दूर होईपर्यंत हा उपाय करत राहावा. अर्थात लसणीच्या पाकळ्या कोरड्या झाल्या की त्या बदलून नव्या सात कळ्या लावाव्यात. या उपायाने फरक पडतो.
वाईट स्वप्न पडत असतील तर :
झोपेत अनेकदा वाईट स्वप्नं पडून दचकून जाग येते. अशा वेळी झोपताना उशीखाली लसूणाचा एक गड्डा ठेवावा. त्यामुळे नकारात्मक विचार, लहरी जवळपास येत नाहीत आणि शांत झोप लागते.
नोकरी-व्यवसायात यश :
सतत परिश्रम करूनही यश मिळत नसेल, महत्त्वाच्या कामाला जाताना लसणीच्या चार पाकळ्या छोट्या रुमालात बांधून खिशात ठेवा. त्याचा दर्प येऊ नये म्हणून टिशू पेपरमध्ये गुंडाळून घ्या. मग रुमालात बांधा. त्यामुळे कामात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते आणि यशाचे दार खुले होते.