हिंदू धर्मात अनेक रूढी, परंपरा आहेत. ज्या आपल्या संस्काराचा भाग आहे. बदलत्या काळानुसार यातील अनेक गोष्टी लोप पावत आहेत. मात्र या गोष्टी आपल्या पूर्वजांच्या दिनचर्येचा भाग होत्या. त्या गोष्टींचे नियमित पालन केले असता संपूर्ण दिवस चांगला जातो आणि त्याचे चांगले परिणामही मिळतात अशी त्यांची श्रद्धा होती व अनुभवही होता. ती मुख्य पाच कामे कोणती ते जाणून घेऊया.
रोज सकाळी हाताचे तळवे पहादररोज सकाळी उठल्याबरोबर अंथरुणावर उठून बसल्यावर सर्व प्रथम आपले दोन्ही हात नमस्काराच्या मुद्रेत जोडावेत आणि नंतर ते पुस्तकासारखे उघडावेत. त्यानंतर तळव्याकडे बघत पुढील श्लोक म्हणावा-कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।कर मूले स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम्॥अर्थ- (माझ्या) हाताच्या समोर लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि मूळ भागात ब्रह्मदेवाचा वास आहे. रोज सकाळी त्यांचे दर्शन घेतल्याने सुख-समृद्धीबरोबरच ऐश्वर्यही प्राप्त होते.
देवाला प्रार्थना करासकाळी उठून आदल्या दिवशी आपल्या हातून घडलेल्या चुकांसाठी क्षमा मागा आणि तुमचा आजचा दिवस चांगला जावो अशी प्रार्थना देखील करा. आयुष्यात येणाऱ्या अडचणीतून मार्ग दाखवण्याची विनंती करा. अशा प्रकारे भगवंताची प्रार्थना केल्याने तुमचे जीवन सुखी राहते आणि देवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतो.
धरणी मातेला नमस्कार रोज सकाळी उठल्यावर धरणी मातेला नमस्कार करा, कारण धार्मिक ग्रंथांमध्ये पृथ्वीला पूजनीय आणि देवी तसेच माता स्वरूप म्हटले आहे. तिच्यावर पाय ठेवण्यापूर्वी नतमस्तक होऊन तिची क्षमा मागा आणि आमचा सांभाळ कर अशी प्रार्थना करा-समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले। विष्णुपंत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥अर्थ- हे समुद्र आणि पर्वतांच्या देवी, भगवान विष्णूच्या पत्नी, मी तुला नमन करतो. तू माझ्या सर्व पापांचे क्षालन कर.
पाणी प्या :सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या. शक्य असल्यास रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर ते प्या. याचे 2 फायदे होतील, एक, तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि दुसरे, तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने सूर्याशी संबंधित दोषही दूर होतील आणि तुम्हाला जीवनात मान-सन्मान मिळेल.
शुभ चिन्ह पहा : दररोज सकाळी उठल्यावर, आपल्या आवडत्या देवतेचे चित्र पहा. याशिवाय तुळशी, स्वस्तिक, लक्ष्मीचे पदचिन्ह, कमळ, शंख यापैकी काही नजरेसमोर ठेवता आले तरी उत्तम! या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणतील.