हिंदू धर्मात शनि त्रयोदशीचे व्रत अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी शंकरपार्वतीसह शनिदेवाची पूजा केली जाते. हे व्रत केल्याने घरात धन, समृद्धी, सुख आणि शांती प्राप्त होते. यंदा ६ एप्रिल रोजी हे व्रत करायचे आहे.
शनी पूजा सर्वांच्याच दृष्टीने लाभदायी ठरते, पण विशेषतः साडेसाती वाल्यांनी या मुहूर्तावर केलेले ज्योतिष शास्त्रीय उपाय नक्कीच फायदेशीर ठरतात. त्यामुळे शनी दोष दूर होतो आणि साडेसातीचा त्रासेदेखील दूर होतो. चला तर जाणून घेऊया शनी त्रयोदशीचा मुहूर्त आणि ज्योतिष शास्त्रीय उपाय!
त्रयोदशी तिथी पूजा मुहूर्त
त्रयोदशी तिथी शनिवार, ६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०:१९ मिनिटांनी सुरू होईल. दुसऱ्या दिवशी रविवारी, ७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०६:५३ मिनिटांनी संपेल. यासोबतच त्रयोदशी तिथीच्या पूजेची वेळ ६ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ०६:०२ ते रात्री ०८:२१ पर्यंत असेल.
शनि त्रयोदशीसाठी खास उपाय
>> शनि त्रयोदशीला शनिदेवाला काळे तीळ, निळे वस्त्र आणि मोहरीचे तेल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.
>> ज्यांना साडेसातीचा बराच काळ त्रास होत असेल त्यांनी शनि त्रयोदशीच्या दिवशी उपवास करावा. असे म्हटले जाते की या व्रतामुळे शनिदोषाचा प्रभाव कमी होतो.
>> शनि त्रयोदशीला हनुमानाची पूजा करणेही खूप शुभ मानले जाते. अशा स्थितीत या दिवशी हनुमान चालिसाचा पाठ अवश्य करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.
>> शनि त्रयोदशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. लक्षात ठेवा दिवा फक्त संध्याकाळीच लावावा. असे केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते.
>> शनि त्रयोदशीला गरिबांना अन्नदान आणि वस्त्र दान केल्याने शनिदेवासह भगवान शंकराची कृपा प्राप्त होते.