ज्याप्रमाणे मिठामुळे जेवणाची चव वाढते, त्याचप्रमाणे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्त्व आहे. मिठाचे काही उपाय ज्योतिष शास्त्रात सांगितले आहेत, जे केल्याने व्यक्ती अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकते
स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्रात वापरल्या जातात. जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते. त्याचबरोबर जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात. पैसा मिळवण्यासाठी आणि कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया मीठाचे ४ खास उपाय.
ज्योतिष शास्त्राप्रमाणे वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितले आहेत. असे म्हणतात की खडे मीठाचा योग्य उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. एवढेच नाही तर पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात. मात्र यासाठी बारीक मिठाचा नाही तर समुद्र मिठाचा अर्थात खडे मिठाचा वापर करणे आवश्यक आहे.
धनप्राप्तीसाठी उपाय
ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून आर्थिक संकटात असेल, विनाकारण पैसे गमावत असेल तर त्यांनी मिठाचा एक उपाय करावा. एक ग्लास पाणी भरून त्यात एक चमचा खडे मीठ टाका. यानंतर तो ग्लास घराच्या नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवा. हा उपाय सलग महिनाभर केल्याने धनहानीपासून मुक्ती मिळते. लक्षात ठेवा की हे पाणी दर दोन दिवसांनी बदलत रहा.
कौटुंबिक कलह दूर होईल
ज्योतिष शास्त्रामध्ये मिठाच्या मदतीने घरातील कलहदेखील दूर करता येतात. घरात रोजचे वाद आणि तणाव असेल तर घराच्या बाथरूममध्ये एका काचेच्या भांड्यात चमचाभर खडे मीठ ठेवा. दर आठवड्याला हे मीठ बदलत राहा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि शांतता नांदते.
कर्जमुक्ती उपाय
जर तुम्ही दीर्घकाळ कर्जात अडकले असाल आणि आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसेल तर ज्योतिष शास्त्राने कर्जातून मुक्त होण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. यापैकी एक म्हणजे रविवारी घरी लादी पुसताना त्यात दोन चमचे समुद्री मीठ टाकावे. हा उपाय सलग तीन महिने केल्याने व्यक्तीचे उत्पन्न वाढते आणि लवकरच कर्जापासून मुक्ती मिळते.
लहान मुलांच्या संरक्षणासाठी
लहान मुलांची मीठ मोहरीने दृष्ट काढतोच, त्याबरोबर आंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर खडे मीठ टाकून अंघोळ घाला. हा उपाय आठवड्यातून एकदा करा. या व्यतिरिक्त, एका ग्लास पाण्यात एक चमचा खडे मीठ टाका आणि मुलाच्या डोक्यावरून ७ वेळा फिरवून फेकून द्या. मुलांचे वाईट ऊर्जेपासून रक्षण होते.