शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

Astro Tips: आपल्या वास्तूवर कायम वैभव लक्ष्मीचा वरदहस्त राहावा, म्हणून करा 'हे' चार सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 3:15 PM

Astro Tips: शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार मानला जातो. लक्ष्मीच्या उपासकांनी तिची कृपादृष्टी लाभावी म्हणून ज्योतिष शास्त्राने सांगितलेले उपाय केले पाहिजेत!

प्रत्येकजण संपत्ती आणि समृध्दीसाठी इच्छा धरतो. यासाठी लोक अनेक प्रकारचे व्रत आणि नवस देखील करतात, परंतु असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे देवी लक्ष्मीची कृपा सहज मिळू शकते. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची उपासना केल्यास आर्थिक त्रास दूर होतो आणि संपत्ती व समृध्दी मिळते. यासाठी पुढील प्रकारे करा देवीची उपासना! 

देवीला लाल वस्त्र अर्पण करा: लाल रंग देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे, म्हणून शुक्रवारी माता महालक्ष्मीच्या मंदिरात जा आणि तिला लाल वस्त्र अर्पण करा. यासह देवीला खणा-नारळाची ओटी भरा, तसेच एखाद्या सौभाग्यवतीची ओटी भरून तिला जेवू घाला. एखाद्या गरीब स्त्रीला वस्त्रदान करा. या उपायांनी पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.

पूजेमध्ये लाल फुलांचा वापर करा: देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी शुक्रवारी पूजा करताना आपल्या हातात लाल रंगाची पाच फुले घ्या आणि देवीचे कोणतेही स्तोत्र, श्लोक मनोभावे म्हणा. आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी देवीची करुणा भाका आणि श्रद्धापूर्वक, ही फुले आपल्या कपाटात किंवा तिजोरीत सुरक्षित ठेवा.

श्री लक्ष्मी नारायण स्तोत्र वाचा:  हे स्तोत्र वाचल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि नित्य उपासना आणि प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला धन आणि कीर्ती मिळते. या स्तोत्राची अनुभूती येऊन इच्छित मनोकामना पूर्ण झाल्यास देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि तो प्रसाद कुमारिकांना द्यावा. 

तांदळाची पुडी तिजोरीत ठेवा: धनवृद्धीसाठी आणखी एक उपाय सांगितला जातो. तो म्हणजे दर शुक्रवारी लाल कपडा घ्या आणि त्यात मूठभर तांदूळ घ्या. आणि त्या कापडाची पुरचुंडी बांधून ती तिजोरीत ठेवा. धन धान्य हे देखील वैभवाचे लक्षण आहे. धान्याच्या बरोबर धनाचीही वृद्धी व्हावी अशी त्यामागील संकल्पना आहे. 

या सर्व उपायांबरोबरच मुख्य गोष्ट लक्षात ठेवा. ती म्हणजे लक्ष्मी केवळ कष्ट करणाऱ्या लोकांवर प्रसन्न होते. आळसी, सुस्त बसून राहणाऱ्या लोकांकडे लक्ष्मी थांबत नाही ती दुसऱ्याकडे निघून जाते. लक्ष्मी मातेला कष्टकरी लोकच आवडतात, त्यांच्यावर तिचा वरद हस्त कायम राहतो. चांगल्या मार्गाने आलेली लक्ष्मी वाढत राहते तर वाईट मार्गाने आलेली लक्ष्मी आहे तेही घेऊन जाते. म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी नेहमी सन्मार्गाचाच वापर करावा. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषVastu shastraवास्तुशास्त्र