'दक्षिण' हा शब्द वाम किंवा डावा या सापेक्षेने शुभ आहे. असे असतानाही दक्षिण दिशेविषयी समाजाच्या मनात दृढ असलेला समज सहजासहजी दूर होण्यासारखा नाही. प्रत्येक दिशेला एका लोकपालाची नेमणूक झालेली असते. त्यानुसार दक्षिण दिशेस यम लोकपालाची नेमणूक असते. वास्तविक यमाविषयी एकप्रकारचा तिटकारा व घृणा मनात असल्यामुळे दक्षिण दिशा ही त्याज्य समजली जाऊ लागली.
ही मजल इथपर्यंत पोहोचलेली असते की, यज्ञप्रक्रियेत दक्षिण दिशेचा नुसता उल्लेख आला तरी तो टाळून 'अवाचि' (बोलून न दाखवण्याजोगी) अशा पदाने तिचा उल्लेख केला जातो. खऱ्या अर्थाने विचार केल्यास यम आणि दक्षिण दिशा यांना अशुभ किंवा त्याज्य समजण्यासारखे असे काही आहे का? असा मोठा प्रश्न आहे. यमाने आपले कार्य केले नसते तर, केवढी भयानक आपत्ती आली असती, याचा नुसता विचारही अंगावर शहारा आणणारा आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला अशुभ समजण्याचे कारण नाही. फक्त त्या दिशेला शुभ कार्य केले जात नाहीत एवढेच! मग हीच दिशा धन संपत्ती देणारी कशी असू शकते? ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी सांगतात...
जगाची दक्षिण दिशा पाहता, त्या दिशेला असलेले सगळे देश पाहिले तर लक्षात येईल की ते श्रीमंत आहेत. मुंबईची दक्षिण दिशा पाहिली तर तिथेही सगळी श्रीमंतांची घरे आहेत. मग आपलेही घर श्रीमंत व्हावे असे वाटत असेल तर घराच्या मध्यभागी उभे राहा आणि दिशादर्शक यंत्र हाती घेऊन घराची दक्षिण दिशा जाणून घ्या.
Swami Samartha: स्वामींचा 'हा' मंत्र घराच्या भिंतीवर लिहून काढा; कायमस्वरूपी तणावमुक्त व्हाल!
वास्तूच्या धनसंपत्तीत वाढ व्हावी, म्हणून सदर उपाय सलग ४५ दिवस करायचा आहे. त्यासाठी तांब्याचा दिवा घ्या आणि त्यात कोणतेही तेल घालून तो दिवा रोज सायंकाळी घराच्या दक्षिण दिशेला प्रज्वलित करा. श्रद्धेने हा उपाय केला असता सकारात्मक अनुभव येतो. यासाठी अन्य कोणतीही बंधने नाहीत. त्यामुळे श्रीमंत होण्याचे नुसते स्वप्न बाळगू नका तर प्रामाणिकपणे मेहनत करा आणि ज्योतिष शास्त्रात दिलेल्या उपायाची जोड द्या.