पूजेत कापूर वापरतात. कापूरआरती करतात, तसेच यज्ञकुंडात समिधा टाकताना कापूर टाकून त्याचे पावित्र्य आणखी वाढवतात. वातावरण शुद्धी बरोबरच कापराचे अनेक फायदे आहेत. याव्यतिरिक्त ग्रहदोष, वास्तुदोष निवारणासाठी देखील त्याचा वापर केला जातो. याठिकाणी आपण ज्योतिष शास्त्राने काल सर्पदोषावर सुचवलेला तोडगा जाणून घेऊ. तसेच त्यामुळे होणारे फायदे जाणून घेऊ.
ग्रहदोष निवारणासाठी ज्योतिष शास्त्रात विविध उपाय सांगितले जातात. मात्र कालसर्प दोष म्हणजे काहीतरी खर्चिक उपाय असणार असा अनेकांचा समज होतो. मात्र त्या दोषाच्या तीव्रतेनुसार उपायात कमी अधिक बदल केले जातात. सदर उपाय हा अतिशय सोपा आणि प्रभावी असल्याने कोणीही त्याचा अवलंब सहज करू शकतो.
नकारात्मक ऊर्जा
एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत प्रयत्न करूनही नकारात्मक ऊर्जा तिच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत असेल तर त्या व्यक्तीला नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यासाठी मीठमोहरीने दृष्ट काढतो तशी कापराची वडी हातात घेऊन पायापासून डोक्यापर्यंत उलट्या दिशेने कापूर फिरवा. दृष्ट काढून झाल्यावर तो कापूर घराबाहेर जाळून टाका.
सकारात्मक ऊर्जा
रात्री स्वयंपाकघरातील सर्व कामे आटोपल्यानंतर लवंग आणि कापूर जाळून ठेवा. असे नियमित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते आणि कुटुंबाची प्रगती होत धन-धान्य प्राप्त होते.
कालसर्प दोषातून मुक्तता
ज्योतिषशास्त्रानुसार कालसर्प दोषातून बचाव करण्यासाठी सकाळ, संध्याकाळ आणि रात्री तिन्ही वेळेस घरामध्ये कापूर जाळल्यास विशेष फायदा होईल. काही दिवसातच तुम्हाला आयुष्यात घडणारे सकारात्मक बदल दिसून येतील. यशाची गाडी प्रगती पथावर वेगाने धावू लागेल आणि वारंवार येणाऱ्या अडचणी दूर होऊन आयुष्यातील आनंद द्विगुणित होईल.