शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

Astro Tips: आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी ज्योतिषी नवरत्न का सुचवतात? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 4:24 PM

Astro Tips: प्रत्येक रत्नाचे गुणविशेष आहेत, आपल्या ग्रहस्थितीला अनुकूलता मिळण्यासाठी संबंधित रत्नांचा वापर सुचवला जातो, त्यामुळे काय बदल होतो ते वाचा. 

>> ज्योतिषी सोनाली लिखितकर 

संकटांमध्ये सापडल्यावर आणि दुसरे कोणते उपाय चालेनासे झाले की माणूस या रत्नांकडे वळतो . खरेतर पूर्वीच्या  काळी जशी आयुर्वेद चिकित्सा  होती त्याच प्रमाणे रत्न चिकित्सा पण केली जात असे . या मागचे कारण म्हणजे माणसाचे शरीर पंच महाभूतांचे बनले आहे. त्याच्या शरीरात जेव्हा एखाद्या गोष्टीची कमतरता होते ,म्हणजे ती कमतरता कधी शाररीक असते ,कधी पूर्व कर्मांमुळे असते .तर कधी पूर्व जन्मीच्या कर्मांमुळे असते. ही कमतरता काहीप्रमाणात भरून काढण्यासाठी आपण औषधे किंवा रत्ने यांचा आधार  घेतो .

या रत्नांमधून मिळणारे किरण हे शरीरावर फायदेशीर ठरतात . जसे आपला मोबाईल किंवा tv चालण्यासाठी satellite ची जरूर असते .अगदी तसेच आपल्या शरीरात ज्या ग्रहांची कमतरता असेल त्या ग्रहाची शक्ती ही ग्रह रत्ने satellite प्रमाणे काम करून शोषून घेतात आणि आपल्याला १ महिना ते ३ महिन्यात गुण दिसू लागतो .

ही रत्ने ९ ग्रहांची आहेत .त्यातील काही खनिज म्हणजे खाणीतून उत्पन्न होणारी तर काही जैविक म्हणजे प्राण्यांनी बनवलेली आहेत. पुष्कराज ,माणिक , नीलम ,हिरा , पाचू, लसण्या ,गोमेद ही रत्ने खाणीतून येतात तर पोवळे  आणि मोती हे समुद्रातले लहानसे जीव बनवतात .प्रत्येक ग्रहाचे एक मुख्य रत्न असते आणि काही उपरत्ने असतात. एकंदर ९ मुख्य रत्ने आणि ८४ उपरत्ने आहेत.पण आज आपण या ९ रत्नांचीच  माहिती प्रथम करून घेऊ या. एकंदर १२ राशी आहेत .

आपल्या राशीप्रमाणे माणूस रत्ने वापरू शकतो पण जेव्हा काही समस्यांकरिता  रत्ने घालायची असतील तेव्हा ती जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेवूनच धारण करावी. यातील प्रथम पाहू पुष्कराज -

१) पुष्कराज(yellow  sapphire ) - हे 'गुरु' ग्रहाचे रत्न आहे .धनु आणि मीन राशीचे रत्न.

हे पिवळ्या किंवा पांढऱ्या रंग छटा  मध्ये मिळते.यामुळे व्यापार धंदा ,आरोग्य आणि वैवाहिक  जीवनात  फायदा होतो.

२)माणिक (ruby )-हे सूर्याचे रत्न आहे. सिंह राशीचे रत्न. लाल ,गुलाबी डाळिंबी रंगांत  मिळते.संततीकरिता ,आयुष्यात  स्थिरता येण्यासाठी, तसेच अधिकार पद मिळण्यासाठी , तेज वाढण्यासाठी  उपयोगी आहे.

३)पाचू(emrald )- हे बुध ग्रहाचे रत्न आहे. हे हिरव्या रंगाचे असते. मिथुन आणि कन्या राशीचे रत्न.बुद्धीची कामे करणाऱ्या लोकांना उपयुक्त आहे .मानसिक शांती आणि श्वास विकारांवर उपयोगी आहे.ज्यांना आपली संभाषण कला वाढवायची आहे त्यांनी अवश्य घालावा.

४)हिरा (diamond )अतिशय तेजस्वी आणि महाग मिळणारे हे रत्न आहे. शुक्र ग्रहाचे रत्न आहे. तुला आणि वृषभ राशीकरिता  उपयोगी आहे. सौंदर्य आणि कलेच्या उपासकांना उपयुक्त असते.

५)नीलम (blue sapphire )शनी ग्रहाचे रत्न आहे .नावाप्रमाणेच निळ्या रंगांत, कधी काळ्या किंवा आकाशी रंगातही असते .मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना चालते.

हे रत्न लवकर प्रभाव दाखवते. म्हणूनच ते घालण्या आधी जाणकार ज्योतिषास विचारूनच घालावे.शानिसम्बंधित दोषांकरिता उपयोगी आहे.

६)मोती (pearl ) हे चंद्राचे रत्न आहे. कर्क राशीच्या लोकांना चालते.मानसिक विकारांवर किंवा मनोबलवाढवण्यासाठी पण त्याच बरोबर संवेदनशील बनवते.

७)पोवळे (coral ) -हे मंगळ  ग्रहाचे रत्न आहे. केशरी किंवा लाल रंगांत ,कधी कधी पांढऱ्या रंगातही मिळते.मन खंबीर करण्याकरिता , डॉक्टर ,पोलीस इ. लोकांना उपयुक्त .तसेच लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून घालतात.

८) गोमेद (heassonite )राहू ग्रहाचे रत्न विटकरी ,लालसर रंगांत येते.हे कोणत्याही एका विशिष्ट राशीकरिता वापरत नाहीत तर काही ग्रहांचा एकत्रित परिणाम साधणे, किंवा जादू टोणा, वशीकरण या सारख्या समस्यांवर उपाय म्हणून वापरले जाते.

९)लसण्या(cat 's eye )- हे केतू ग्रहाचे रत्न आहे .हे मांजराच्या डोळ्याप्रमाणे दिसते .राखाडी ,किंवा काळसर ,पांढऱ्या रंगांत येते .याला सुद्धा स्वतःची रास नाही .पण नजर लागणे ,गुप्त शत्रूपासून रक्षण ,वाईट स्वप्नांपासून रक्षण याकरिता उपयोगी आहे.

तर अशी ही भाग्यरत्ने..

संपर्क -9890447025

टॅग्स :Astrologyफलज्योतिष