शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
4
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
5
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
6
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
7
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
8
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
9
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
10
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
11
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
12
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
13
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
14
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
15
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
16
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
19
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
20
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

Astro tips: तापट डोक्याच्या लोकांना हिऱ्याची अंगठी घाला असे ज्योतिष तज्ज्ञ का सुचवतात? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 1:32 PM

Astro Tips: हिऱ्याची चमक लक्षवेधक असते, शिवाय ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही तो वापरण्याचे अनेक लाभ आहेत, पैकी एक म्हणजे रागावर नियंत्रण!

सोने, चांदी खरेदी पर्यंत आपली मजल जाते, मात्र आयुष्यात कधीतरी हिरा खरेदी करावा असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हिरा महाग असूनही तो अतिशय गुणकारी असल्याने ज्योतिषी त्याचे लाभ शरीराला मिळावेत म्हणून हिऱ्याची अंगठी परिधान करा असे सुचवतात. एवढे काय महत्त्व आहे हिऱ्याचे? त्याचे गुणधर्म कोणते ते छोट्याशा उदाहरणातून जाणून घेऊ. 

एक राजा असतो. थंडीच्या दिवसात उबदार वाटावे म्हणून राजदरबार पटांगणात भरतो. एक व्यक्ती येते आणि म्हणते माझ्या कडे दोन एकसारखे हिरे आहेत. अनेक राज्यात जाऊन आलो पण कोणालाही यातला  खरा हिरा ओळखता आला नाही. यात खरा कोणता आणि खोटा कोणता हे ओळखण्याची संधी तुमच्याही राज्यातल्या लोकांना देऊ इच्छितो. राजासमोर दोन्ही हिरे पेश करण्यात आले. राजाही अचंबित झाला. तो माणूस म्हणाला, राजन यातला खरा हिरा तुमच्यापैकी कोणालाही ओळखता आला तर हा तुमच्या राजखजिन्यात ठेवून घ्या आणि जर नाही ओळखला तर माझ्या कलाकाराचे बक्षीस म्हणून त्या हिऱ्याच्या दुप्पट किमंत मला द्या!' राजा त्याची अट मान्य करतो आणि सर्वांना आवाहन करतो. 

राजदरबारात सगळे पारख करू लागतात . कोणालाच ओळखू येत नाही. तेव्हा एक अंध व्यक्ती म्हणते मी ओळखून दाखवतो. लोक कुजबुजतात. डोळस लोकांना जे बघून कळले नाही ते अंध व्यक्तीला कसे दिसणार यावर चर्चा करतात. अंध व्यक्ती काही क्षणात खरा हिरा ओळखते आणि खोटा कोणता ते सांगते.  हिरा बनवणारी व्यक्ती देखील आश्चर्यचकित होऊन विचारते. त्यावर ती अंध व्यक्ती म्हणते,  की आपण उन्हात बसलो होतो. उन्हात काच गरम झाली. हिरा मात्र थंड राहिला. त्यामुळे खरा कोणता आणि खोटा कोणता हे मी लगेच ओळखले. 

या गोष्टीतून सांगायचे म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या लोकांवर रागावत असतो आणि अनेक चांगल्या व्यक्ती, चांगले मित्र आपल्या आयुष्यातून दूर होतात. कधी कधी क्षणिक तर कधी कायमच्या दुरावतात.

ज्याने विपरीत परिस्थिती मध्ये ही आपला स्वभाव बदलला नाही, टिकवून ठेवला . शांत राहिला ..बाह्य परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होऊ दिला नाही. तो हिरा .. तो सर्वांना हवाहवासा वाटणारा. आणि जो छोट्या छोट्या गोष्टीवरून तडकतो, तो खोटा हिरा अर्थात काच!

यावरून हिऱ्याचा शांत गुणधर्म आपल्या लक्षात येतो, तोच गुण आपल्यातही यावा किंवा त्याचा प्रभाव आपल्यावर राहावा म्हणून ज्योतिषी तापट लोकांना हिऱ्याची अंगठी परिधान करा असे सांगतात. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष