जव हे एक पवित्र धान्य आहे, जे स्वयंपाकघरात तसेच पूजेत वापरले जाते. हवन साहित्यापासून ते नैवेद्य बनवण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये त्याचा वापर केला जातो.
आपल्या स्वयंपाकघरापासून ते औषधांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये जव वापरले जाते. पण त्याचा उपयोग फक्त स्वयंपाकघरातच नाही तर पूजा आणि धार्मिक विधींसाठी देखील केला जातो. अनेक धार्मिक विधी तर असे आहेत, जे जव वापरल्याशिवाय अपूर्ण मानले जातात. नवरात्रीत जवाचे खूप महत्त्व आहे, नवरात्रीच्या नऊ दिवसांची पूजा जव पेरल्यानंतरच सुरू होते. याशिवाय यज्ञ साहित्यात जवाचे महत्त्व सांगितले आहे. ते महत्त्व जाणून घेऊया.
जव हे ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते
धार्मिक ग्रंथानुसार जव हे ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते. पूजेनंतर यज्ञ करताना जवापासून बनवलेले पदार्थ किंवा मूठभर जव अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके आहे.
नवरात्रीत पेरलेले जव आणि वास्तूची भरभराट :
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जव पेरण्याची परंपरा आहे. नवरात्रीत जव जितक्या वेगाने वाढेल तेवढ्या वेगाने त्या कुटुंबात प्रगती आणि समृद्धी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मात्र तेच जव कुजले किंवा चांगली वाढली नाही तर प्रगती थांबते असाही अनेकांचा अनुभव आहे.
जवाचा इतर वापर :
नवरात्री आणि यज्ञ साहित्याव्यतिरिक्त कोणत्याही विशेष सण किंवा प्रसंगी दानासाठी जवाचा वापर केला जातो. जव दान करणाऱ्या व्यक्तीला अधिक पुण्य लाभते. याशिवाय सर्व दानांमध्ये जवाचे हे दान विशेष मानले जाते.
तर्पण विधी तसेच श्राद्धविधमध्येही जवाचा वापर केला जातो. ज्यांना कुंडलीदोष आहे, त्यांना पिंपळाच्या झाडाला पाणी देण्याबरोबरच जव दान करा असे सांगितले जाते.