शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

Astrology: ज्योतिष शास्त्रात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची क्षमता आहे, मात्र 'ही' अट पाळायला हवी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 4:04 PM

Astrology : ज्योतिष विद्या सोपी नाही, तुटपुंज्या माहितीवर भाकीत करणे योग्य नाही, म्हणूनच भविष्य सांगणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने दिलेली अट पाळायला हवी!

>> अस्मिता दिक्षित, ज्योतिष अभ्यासक 

ज्योतिष हे कालविधान शास्त्र आहे . काळ हा अनंत काळापासून आहेच, तो काल होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे . म्हणूनच आपणही काळासोबत चालले पाहिजे . घटना नेमकी कधी घडणार हे नेमके आणि अचूक सांगणारे हे शास्त्र मात्र आज कित्येकांची अवहेलना झेलत आहे. अपुरे ज्ञान आणि शास्त्राचा मांडलेला अक्षरशः बाजार हीच त्याची कारणे आहेत. नुसते क्लास केले आणि सर्टिफिकेट मिळाले की झाले का सर्व? क्लास , कार्यशाळा या शास्त्राची ओळख करून देतील पण पुढे काय ? पाया भक्कम तुमचा स्वतःचा अभ्यास करणार आहे आणि वरची इमारत तुमची तुम्हालाच बांधायला लागेल त्यासाठी प्रचंड मेहनत , हजारो पत्रिकांचे विवेचन , रोजची साधना आणि गोचरीच्या ग्रहांचा अभ्यास महत्वाचा ठरेल. आपल्या वैयक्तिक साधनेशिवाय सर्व फोल आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते.

मानवी मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास हे शास्त्र समर्थ आहे. आपल्या पुढील पिढ्यांचे नामकरण काय असू शकेल ह्याबद्दल गुरुवर्य श्री. श्री. भट सरांनी खूप संशोधन केले होते. ग्रहांच्या गती ज्याकडे सहसा आपले लक्ष जात नाही अशा कित्येक गोष्टींचा विचार पत्रिकेच्या फलादेशात करावा लागतो. त्यातील एक जरी केला नाही तर आपले उत्तर चुकण्याची शक्यता असते. ज्यांना हे शास्त्र अवगत करायचे असेल त्यांनी आपला उभा जन्म ह्या अभ्यासासाठी वेचण्याची आणि ज्ञानरूपी खोल समुद्रात उडी मारण्याची तयारी ठेवावी. वरवरचा अभ्यास उपयोगाचा नाही. असे करून आपण फक्त दुसऱ्यांची नाही तर स्वतःचीही फसवणूक करत असतो. असो. 

ज्योतिष शिकण्यासाठी सर्वात प्रथम शास्त्रावरचा , शास्त्र कर्त्यांवरचा विश्वास अभेद्य हवा , शिकण्याची प्रवृत्ती , जिज्ञासू वृत्ती हवी, अध्ययन करण्याचा ध्यास , कष्ट करण्याची तयारी हवी . मनन चिंतनाची मनाला सवय हवी तसेच प्रत्येक गोष्टीची सांगड ज्योतिष विद्येशी घालण्याची संशोधक वृत्ती जोपासायला हवी . नुसते पुस्तकातील नियम वाचून काही होणार नाही तर ते प्रत्यक्ष आयुष्यात कसे फळतात तेही पाहायला हवे. उदा. द्यायचे झाले तर ३ दिवसापूर्वी राहूचे नक्षत्र होते . मी काही video रेकोर्ड केले होते त्यानंतर मी दोन वेळा ते पाहिले सुद्धा होते, पण त्या दिवशी मी पाहिले तेव्हा आवाज चित्र काहीही दिसले नाही , राहुने त्याचे अस्तित्व मला दाखवले त्या दिवशी. 

ज्योतिष आपल्या मदतीला तत्पर आहे. जसे चंद्र हा सर्वात जलद गती ग्रह आहे त्यामुळे प्रश्न कुंडली मध्ये जर चंद्राचे कर्क लग्न आले तर उत्तर “ हो “ आहे हे बिनधास्त सांगावे. पण शनी असेल तर सगळ्याला विलंब . ग्रहांचे कारकत्व समजले तर प्रश्नाची उकल नक्कीच होईल.

आजकाल इंस्टंन्टचा जमाना असल्यामुळे आणि संयम संपुष्टात आल्यामुळे सगळ्यांना सगळ्या गोष्टी शॉर्टकटने हव्या असतात.  दुर्दैवाने ह्या शास्त्रात ते नाहीत आणि ते असावे हे वाटणे ही दुर्दैवाची बाब आहे. ज्योतिष हे तर्कशास्त्र आहे. असे तर्क हे रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत पण आपले त्याकडे लक्षच नसते . निसर्ग सुद्धा आपल्या जीवनावर खूप परिणाम करत असतो , अनेक गोष्टी शिकवत असतो  पण आपले काश्याकडेच लक्ष नसते . 

आपल्या आयुष्यातील काळ हा सतत पुढे जात असतो आणि हातातून वेळ निघून जाते म्हणूनच प्रत्येक अभ्यासकाने स्वतःला ह्या शास्त्राच्या अभ्यासासाठी झोकून काम केले पाहिजे . इतर अभ्यासकांचा आदर आणि त्यांच्याकडील विचारांचा योग्य मान सुद्धा ठेवला पाहिजे . मानवी जीवन आणि मन हे खूप गुंतागुंतीचे आहे आणि तो गुंता सोडवायचा असेल तर अभ्यासाचा पाया भक्कम हवा . ग्रह तार्यांशी संवाद साधता आला पाहिजे , त्यांची तत्वे , कारकत्व सर्व काही समजले पाहिजे .

कित्येक वेळा एखादी पत्रिका बघून सुद्धा एखादी ग्रहस्थिती किंवा योग आपल्या लक्षात येत नाही . ह्यावरून अभ्यासाची खोली समजेल. सूर्यमालिकेत रवी हा तारा , चंद्र हा उपग्रह आणि बुध शुक्र मंगल गुरु शनी हे सर्व ग्रह आहेत , त्यांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे . ह्या शिवाय पातबिंदू राहू केतू हेही आहेत . ग्रह जे ग्रहण करतात ते आपल्यापर्यंत आणून देतात . 

ज्योतिष ही एक साधना आहे, तपश्चर्या आहे आणि त्यातून तावून सुलाखून निघण्यासाठी संयमाची गरज आहेच आहे . पी हळद हो गोरी इथे लागू पडत नाही . ज्योतिष अभ्यासकांनी प्रत्येक क्षणी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करताना गोचर ग्रहस्थितीची सुद्धा सांगड घातली तर अनेक प्रश्नांची कोडी सहज सुटतील. ज्योतिष तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास नक्कीच समर्थ आहे , फक्त अभ्यास सखोल हवा . अभ्यासकाला विषयाचे गांभीर्य असावे आणि ही विद्या शिकण्यासाठी समर्पणाची भावना हवी . ग्रह तार्यांची कृपा झाली तर काहीच अशक्य नाही . जितके ग्रंथांचे वाचन तितकी प्रगल्भता अधिक .हा आत्म्याचा अभ्यास आहे जो सर्वार्थाने परिपूर्ण असाच आहे . अंतिम सुख ह्यातच आहे . आपल्याला नोकरी कधी मिळणार हे समजले की आपली मिटते ती चिंता कारण आपले उत्तर आता मिळालेले असते . एकदा ते मिळाले की आपण शांत होतो . एखाद्याचा विवाह होणार नसेल आणि ते एकदा समजले तर दुःख  होईल पण किती दिवस ??? एक दिवस व्यक्ती आहे ती स्थिती स्वीकारेल आणि आयुष्य जगायला प्रवृत्त होयील. 

देव सगळ्यांना जगवत असतो . कुणाचे काहीही व्हायचे बाकी राहत नाही . माझी आजी ९९ वर्षाची होती ती गेली तेव्हा मला वाटले मी उद्याचा सूर्योदय पाहणार की  नाही कारण तिची आणि माझी अगदी एक नाळ होती . सहवास तितके प्रेम . पण महिन्याभरातच माझ्या मुलाचा जन्म झाला आणि संपूर्ण घर हसते खेळते झाले. आयुष्य पुढे गेले आणि जात राहील. 

अत्यंत सन्मानीय असे हे शास्त्र आहे. ह्याचा अभ्यास करायला सुद्धा तितकेच पूर्व सुकृत असायला लागते .  उत्तम ज्योतिषी तयार होणे ही आज काळाची गरज आहे. कारण हे शास्त्र तुम्हाला तुमच्या उत्तरापर्यंत न्यायला आणि जीवन सुखकर होण्यास मदतच करते . आज जीवनात अनिश्चितता आहे आणि एक प्रकारच्या अनामिक भीतीत, दडपण घेवून  प्रत्येक जण जगताना दिसतो . ज्योतिष हा जीवनाचा कणा आहे. उत्तम उपासना हेही जीवनात तितकेच महत्वाचे आहे. सद्गुरुकृपा , त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय काहीही शक्य नाही , हे अगाध ज्ञान मिळवणे आणि त्याचा समाज , जन हितासाठी उपयोग करून देण्यासाठी त्यांची कृपा लागते . दोन पुस्तके वाचून ज्योतिषाचे  दुकान उघडलेत तर ते तितक्याच वेगाने  बंद सुद्धा होईल हे लक्ष्यात घ्या . कुणालाही कारण नसताना ही शांत करा , ती शांत करा हा अभिषेक करा हे सांगताना अंतर्मुख व्हा आणि स्वतःला विचार मी सांगतोय ते योग्य आहे ना? कारण सरतेशेवटी आपल्याला त्यालाच उत्तर द्यायचे आहे . आपण जगाला फसवू पण स्वतःला आणि त्याला तर फसवू  शकणार नाही. सगळ्यांचा बाप वरती बसलाय ह्याचा विसर नको. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. अनेक उत्तरे आपली आपल्यालाच मिळतात कोण देणार???  तर आपली स्वतःची साधना . 

आज अमावास्या आहे . चंद्र रवी एकत्रित ताकद अंतर्मुख करते . मनुष्य हा बाह्य जगातील भौतिक सुखात सदैव रमतो आणि अंतर्मुख होण्यास विसरतो . आज अंतर्मुख व्हा , स्वतःशीच संवाद साधायची हि संधी सोडू नका . आज सुषुम्ना नाडी म्हणजेच निसर्गाची नाडी चालू आहे ती तुमची नाळ पुन्हा एकदा निसर्गाशी आणि मातीशी जोडायला समर्थ आहे. आपण ह्या मातीतूनच जन्मलो आहोत आणि ह्या मातीतच विलीन होणार आहोत हेच अंतिम सत्य आहे.

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिष