आयुष्यात नशीब चमकायची वेळ आली, की काही खास संकेत मिळायला सुरुवात होते. हे संकेत आपल्याला विविध प्रकारे मिळत असतात. ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रात यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात, अगदी रात्रीच्या स्वप्नांपासून ते आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचाही समावेश आहे. आज आम्ही आपल्याला अशाच काही शूभ संकेतांसंदर्भात माहिती देणार आहोत. जे आपल्याला रस्त्याने चालताना अगदी सहजपणे मिळत असतात. जसे की रस्त्यात नाणे सापडणे, शंख अथवा स्वस्तिकसारखी एखादी शूभ वस्तू सापडणे किंवा घरातून बाहेर पडताच एखादी शुभ वस्तू दिसणे...
रस्त्यात नाणे आणि शंख सापडणे - रस्त्याने चालता-चालता आपल्याला अनेक वेळा अनेक प्रकारच्या वस्तू सापडत असतात. मात्र, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये अशा काही खास वस्तू अथवा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या सापडणे अत्यंत शुभ मानले जाते. या वस्तू म्हणजे, नाणी, स्वस्तिक, घोड्याची नाल आणि शंख. या वस्तू सापणे, हा आयुष्यात सौभाग्य, सुख-समृद्धी येण्याचा संकेत आहे.
जर आपल्याला रस्त्यात एखादी अशी गोष्ट सापडली, की ज्यावर स्वस्तिक चिन्ह आहे. तरी ती घेऊन प्रणाम करा आणि घराच्या अंगनात पुरून टाका. जर हे शक्य नसेल तर पुजेच्या ठिकाणी ठेवा. तसेच, घोड्याची नाल सापडल्यास ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा. याशिवाय, पैसे अथवा शंख सापडल्यास ते पुजेच्या ठिकाणी ठेवावे.
रास्त्यात या गोष्टी दिसणे शुभ - तसेच घरातून निघताच रस्त्यात पाण्याने भरलेले एखादे पात्र, पांढरी गाय, उस, अथवा पिल्लाला दूध पाजताना गाय दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे कामात यश मिळते आणि जीवनात एखादी चांगली घटना घडण्याचे संकेत देतात. तसेच, सकाळच्या वेळी घरातून बाहेर पडताच कुणी झाडू मारताना दिसले, तर हा आपल्यावर लक्ष्मीची कृपा असण्याचा संकेत आहे.