अखेर ‘ते’ भाकीत खरे ठरले! राजकीय घडामोडींवर गेल्या वर्षी केली होती भविष्यवाणी, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 04:40 PM2023-07-05T16:40:59+5:302023-07-05T16:43:07+5:30

Sharad Pawar Vs Ajit Pawar Prediction Come True: आणखी एक भाकीत, तशाच घडामोडी, तसेच संकेत... मोठ्या लोकांना राजीनामा द्यावा लागणार... घडलेय की घडायचेय?

astrology prediction of maharashtra political crisis come true and many things was predicted last year | अखेर ‘ते’ भाकीत खरे ठरले! राजकीय घडामोडींवर गेल्या वर्षी केली होती भविष्यवाणी, फोटो व्हायरल

अखेर ‘ते’ भाकीत खरे ठरले! राजकीय घडामोडींवर गेल्या वर्षी केली होती भविष्यवाणी, फोटो व्हायरल

googlenewsNext

Sharad Pawar Vs Ajit Pawar Prediction Come True: वर्षभरापूर्वी शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर आता बरोब्बर एक वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जवळपास ३५ आमदारांना सोबत घेऊन विद्यमान भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शवला. पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यातच आता एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते असून, यासंदर्भात केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

अजित पवारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार व शरद पवार यांनी दोन वेगवेगळ्या बैठका बोलावल्या. यामध्ये दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटोवरून त्यात जो अंदाज वर्तवला आहे, तशाच गोष्टी घडताना दिसत आहेत. एका ज्योतिषशास्त्रासंदर्भातील मासिकात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात राज्यातील राजकीय उलाढालीबाबतची भाष्य करण्यात आले आहे. 

नेमकी काय भविष्यवाणी केली होती?

शुक्र-मंगळ युतीचा नेपच्यूनशी षडाष्टक योग झाल्यामुळे या काळात वादळी पावसाने मोठे नुकसान संभवते. या योगामुळे कलाकार किंवा खेळाडू यांच्यावर मोठे आरोप होतील. मोठ्या कलाकार किंवा खेळाडूंचे मृत्यू या काळात संभवतात. एखाद्या मोठ्या कलाकार किंवा खेळाडूचा गुढ पद्धतीने मृत्यू संभवतो. अशा व्यक्तींना अपघात किंवा घातपाताच्या घटना या काळात संभवतात, असे सांगितले आहे. तसेच राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काही अनपेक्षित किंवा नाट्यमय घडामोडी या काळात संभवतात. या काळात काही राज्यामध्ये मध्यावधी निवडणूकाची शक्यता राहील. महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीमध्ये नाट्यमय बदलाव या काळात संभवतात. मोठ्या पदावरील व्यक्तींना राजीनामे द्यावे लागतील. या काळात होणान्या निवडणुकीत सत्तांतर किंवा सत्ता बदल होण्याची शक्यता असून मोठ्या पक्षात फूट पडेल. विश्वासघाताचे राजकारण या काळात अनुभवास येतील. रवि-प्लुटो प्रतियोगामुळे महत्त्वाच्या राज्यातील सरकार अल्पमतात येईल, असे भाकित करण्यात आले होते.  

सत्तेसाठी विचित्र युती किंवा आघाडी निर्माण होऊ शकते

याशिवाय, मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू या काळात संभवतो. मोठ्या व्यक्तींवर प्राणघातक हल्ला किंवा घातपात किंवा घातपाती मृत्यू या काळात होण्याची शक्यता वाटते. गुरु-राहु-हर्षल युतीमुळे पावसाळी अधिवेशन गोंधळाचे राहील. विरोधक सत्ताधारी गटामध्ये मोठे वादविवाद होतील. या काळात सत्तेसाठी विचित्र युती किंवा आघाडी निर्माण होऊ शकते. अनपेक्षितपणे मोठ्या पक्षातील एखादा गट दुसऱ्या पक्षाबरोबर होत मिळवणी करू शकतो, असे दावा करण्यात आला होता. निवडणुकीनंतर नवीन समीकरण सत्तेमध्ये येऊ शकते. यामधून विश्वासघात किंवा संधी साधू राजकारणाचा अनुभव येईल. वोटिंग मशीन विषयी शंका घेतल्या जातील. बॅलेट पेपरवर मतदानाचा आग्रह विरोधकांकडून धरला जाईल. सत्ताधारी पक्षावर चुकीच्या मार्गाने सत्ता मिळविल्याचे आरोप होतील, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, ०६ जुलैपासून होणाऱ्या शुक्र-मंगळ युतीमुळे सेलीब्रेटींचे विवाह किंवा ब्रेकअपच्या बातम्या प्रसिद्ध होतील. स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना या काळात वाढण्याची शक्यता राहील. वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठ्या व्यक्ती अडचणीत येतील. या काळात मोठ्या व्यक्तींची प्रेमप्रकरणे विशेष गाजतील. या काळात मोठ्या नेत्याच्या मृत्यूमुळे राष्ट्रध्वज अर्ध्यावर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रभर शोक व्यक्त केला जाईल. अशा काही घटनामुळे राजकीय भूकंप होऊ शकतो, अशा काही शक्यताही वर्तवण्यात आल्या आहेत. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: astrology prediction of maharashtra political crisis come true and many things was predicted last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.