>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
शनी हा आयुष्याच्या संध्याकाळी भेटणारा ग्रह, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आयुष्याची संध्याकाळ म्हणजेच वार्धक्य आणि शनी वार्धक्याचाच ग्रह आहे. ग्रहमालिकेतील सर्वात बाहेरचा ग्रह म्हणून त्याचे वर्तुळ सुद्धा मोठ्या आकाराचे आणि म्हणून अडीच वर्ष एका राशीत भ्रमण करणारा शनी जनमानसावर प्रचंड पकड ठेवून आहे. आयुष्याच्या संध्याकाळी तो भेटतो, ते आयुष्यभराच्या आपल्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब करण्यासाठी!
शनी आला कि पळापळ होते. पण तसे बघायला गेले तर लहान सहान गोष्टीनी सुद्धा प्रसन्न होणारे हे शनिदेव शासन करताना मात्र कुठलीच तडजोड करणार नाहीत . दंड देणे , शिक्षा सुनावणे हे त्यांचे काम आणि त्याची अंबलबजावणी वेळेतच होते.
शनीची साडेसाती , पनवती , दशा , अंतर्दशा , विदशा आली कि पत्रिकेतील शनी आपली कामगिरी चोख बजावतो . तिथे कुणाची ओळख, चिठ्ठी चपाटी काम करत नाही. समज असण्यापेक्षा ह्या ग्रहाबद्दल गैरसमज खूप आहेत. शनी सामान्य जनतेचा कारक म्हणजे सेवक आहे . जो चुकणार तो दंड भोगणार.शिक्षेस पात्र ठरणार. हा साधा सरळ हिशोब आहे. चुका पापे करताना काही वाटत नाही मग शिक्षेला सुद्धा सामोरे जा की, त्यात काय ? तेव्हा का घाबरायचे?
इतर ग्रहांपासून वेगळे असे त्याचे अस्तित्व शनीने अबाधित ठेवले पाहिजे. शनी सामान्य लोकांचा कारक आहे. म्हणूनच करोना मध्ये सामान्य माणसाची किंमत जगाला समजली. न्यायाने , नीतीने जो जीवन व्यतीत करतो, इतरांना सन्मानपूर्वक वागणूक देतो आणि अहंकार विरहित जीवन जगतो त्याचे जीवन शनी उजळून टाकतो . कष्ट करणाऱ्या व्यक्ती शनीला प्रिय आहेत . मी असा आणि मी तसा म्हणणाऱ्या लोकांचे शनी आयुष्याच्या शेवटी अक्षरश हाल करतो . म्हणूनच आयुष्यभर माणसाने विचारपूर्वक कृती केली पाहिजे . आपण कुणाला बोलतोय आणि काय बोलतोय ह्याचा विचार बोलण्यापूर्वी केला पाहिजे.
नुसते बसून खाणाऱ्या व्यक्ती शनीच्या शिक्षेस पात्र ठरतात . आपल्या आयुष्यातील आणि गत आयुष्यातील चांगल्या वाईट कर्माचा हिशोब त्याच्याजवळ आहे . आपण काय काय चुका आणि पापे केली आहेत ते फक्त आपल्याला आणि देवालाच माहित असतात आणि अशीच लोक साडेसाती यायच्या आधीच घाबरतात . हे कटू सत्य आहे.
रावाचा रंक करण्याची ताकद ह्या ग्रहाजवळ आहे. रस्त्यावर पण आणेल आणि एखाद्या कंपनीच्या उच्च पदावर पण नेईल. एखादा बरा न होणारा आजार देईल आणि खंगत ठेवील. अभक्ष भक्षण आणि व्यसनाधीनता शनीला अजिबात आवडत नाही . ह्यात जो गुरफटला त्याचे शनी दशेत खरे नाही .
उपासना असेल तर शिक्षा कमी होते पण माफ होत नाही . काहीही झाले की शनीवर खापर फोडणे बंद केले पाहिजे . आज आपण इतके वाचतो , अनुभवतो , सोशल मिडीया वरच्या ज्ञानगंगेत डुबकी मारतो, पण अजूनही आपल्याला शनी समजला नाही . शनी आपल्या आत आहे आणि म्हणूनच प्रत्येक कर्म करताना त्याच्या अस्तित्वाची आठवण ठेवली तर कर्म सुधारतील आपली . नाहीतर सकाळी कर्म केले की लगेच संध्याकाळी शिक्षा होणारच .
शनी हा मित्र आहे, आयुष्यातील खरा प्रकाशझोत आहे. शनी कर्मवादी आहे. सर्वात प्राधान्य कर्माला देणारा एकमेव ग्रह. सगळ्यात राहून तटस्थ कसे राहायचे ते शनी शिकवतो पण आपण शिकत नाही . शनी सामान्य जनतेचा कारक आहे त्यामुळे सामान्य माणसाला त्रास दिला त्याच्या असहायतेचा फायदा घेवून त्याच्याकडून काम करून घेणार्यांचे शनी हाल करतो हे नक्की. शनी कमरेखालील भाग दर्शवतो . शनी दशेत किंवा महादशेत रोज छडी घेवून बसणार नाही पण एकच फटका मारेल की ज्याचा दाह त्रास आयुष्यभर भोगावा लागेल, आपले भावविश्वच उध्वस्त करेल . मनाला त्रास देणाऱ्या घटना म्हणजे मातृ पितृ छत्र हरवणे अर्थात ह्यासारखी दुसरी मोठी दुखा:ची गोष्ट असूच शकत नाही. दुसरे म्हणजे आजारपण . शनीचे आजार म्हणजे अपंगत्व , शनी वायुतत्वाचा आहे त्यामुळे हातपाय वाकडे होणे , अपंगत्व , शरीराची एखादी बाजू किंवा अवयव निकामी होणे , हाडांची दातांची दुखणी , अर्धांगवात , वाताची दुखणी , पायात गोळे येणे , वातविकार , दीर्घ काल अंथरुणाला खिळून राहणे , शनी दुर्गंधी युक्त आजार देतो. अहंकारं बलं दर्पं ...अहंकारी व्यक्तीच्या अहंकाराचा दर्प आधी येतो आणि मग व्यक्ती येते . अहंकार माणसाच्या आयुष्याची माती करतो आणि हा अहंकारच शनीच्या शिक्षेस कारणीभूत ठरतो .
शनी वृद्धत्वाचा कारक आहे. वार्धक्य कुणालाही चुकले नाही . अंधाऱ्या कोठड्या म्हणजे शनी आणि एकटेपणा म्हणजे पण शनीच . शनी म्हणजे वैराग्य , एकांतवास . शनीला मोहमाया नको आहे. साधेपणा , सरळ जीवन शनीला प्रिय आहे. होत्याचे नव्हते करणारा शनी. मृत्यू सगळ्यांनाच येणार आहे पण तो कसा येईल हे शनीच्या हातात आणि अर्थात आपल्या कर्माशी सुद्धा निगडीत आहे. आपल्या कर्माचे फळ देण्यास शनी बांधील आहे त्यामुळे उगीच त्याला व्हिलन करू नका .
साधना हा जीवनाचा मोठा आधार आहे. राहू आणि शनी साठी एकमेव उपाय म्हणजे हनुमान चालीसा . उपाय सांगा म्हणून अनेक जण विचारतात पण सांगितले तर करतात किती??? हा महत्वाचा प्रश्न आहे. शेवटी जसे घडायचे तशी बुद्धी होते माणसाला. शनी हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे.
श्री स्वामी समर्थ
संपर्क : 8104639230