शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

Astrology Tips: हिवाळ्याच्या थंडीत करा सूर्योपासना आणि दूर करा आर्थिक व आरोग्याच्या विवंचना!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:58 AM

Astrology Tips: थंडी सुरू होताच आपण आरोग्य सुधारण्यावर भर देतो, त्यासाठी सुचवलेला सूर्य उपासनेचा मार्ग आरोग्य आणि आर्थिक अडचणी नक्की दूर करेल!

हिंदू धर्मात पाच मुख्य देवतांमध्ये पहिले स्थान सूर्यदेवाला मिळाले आहे. कारण सूर्यदेव एकमेव असे आहेत, ज्यांना धरतीवरून प्रत्यक्ष पाहता येते. जीवसृष्टीसाठी सूर्यदेवाचे अतिशय महत्त्व आहे. वेदांमध्ये सूर्यदेवाला सृष्टीचा आत्मा म्हटले आहे. सूर्यप्रकाशामुळे सृष्टीचे चक्र सुरळीत फिरत आहे. सूर्यदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शास्त्राने रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे असे सांगितले आहे. 

सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता वाढते, तसेच हातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले आहे. जर तुमच्या कुंडलीत रवि प्रबळ असेल, तर तुमचे भाग्य तुम्हाला राजपथापर्यंत नेते. अशा व्यक्ती ज्या क्षेत्रात जातात त्याच्या शिखरापर्यंत पोहोतचात. अशा लोकांना सरकारी नोकरी मिळण्यातही अडचणी येत नाहीत. तुमच्या कुंडलीतील ग्रहदशा बदलून रविस्थान प्रबळ झाले, तर अन्य पापग्रहांचा त्रास तुम्हाला होऊ शकत नाही. 

सूर्यदेवाला प्रसन्न करून घेण्याचा उत्तम पर्याय आहे, सूर्याला अर्घ्य देणे. रविवार सूर्यदेवाला समर्पित आहे. अन्य दिवशी जमले नाही, तरी या दिवशी सूर्याला अवश्य अर्घ्य द्यावे. जी व्यक्ती सूर्यदेवांना अर्घ्य घेऊन दिवसाची सुरुवात करते, तिच्या वाट्याला अपयश येत नाही. सूर्याला अर्घ्य देण्याचे शास्त्रात अनेक फायदे सांगितले आहेत. 

>>सूर्याला अर्घ्य दिल्याने नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतील.  तसेच नोकरीत बढती मिळत राहील. 

>>जी व्यक्ती सूर्याला अर्घ्य देते, तिला सूर्यासारखे तेज प्राप्त होते. त्यामुळे व्यक्तीमत्त्व आकर्षक बनते व लोकप्रियता वाढते. 

>>पुराणातील उल्लेखानुसार भगवान महाविष्णू यांनी राम अवतारात जन्म घेतला, तेव्हा ते रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देत असत. याचेच फलित असे, की बलाढ्य शक्तीचा रावण श्रीरामांच्या केसालाही धक्का लावू शकला नाही. 

तुम्हालाही तुमच्या कार्यक्षेत्रात शिखर गाठायचे असेल, तर पुराणात सांगितलेला उपाय अवश्य करा.

  • सर्वप्रथम सूर्योदयापूर्वी उठा. सूर्यदेवाला एका निरांजनात तेल आणि वात लावून दिवा दाखवा. त्यानंतर एका तांब्याच्या कलशात पाणी घेऊन पूर्व दिशेला तोंड करून 'ओम सूर्याय नम:' या मंत्राचा तीनदा उच्चार करा. अर्घ्य देऊन झाल्यावर जमिनीवर डोके ठेवून सूर्यदेवांना नमस्कार करा. 
  • यावेळी एक खास उपाय करा, जेणेकरून तुमचा अकाली मृत्य टळेल. आजारातून सुटका होईल. दीर्घायुष्य प्राप्त होईल. तो उपाय म्हणजे-
  • तांब्याच्या कलशात यमुनेच्या पाण्याचे दोन चार थेंब टाका. यमुना ही सूर्यदेवांची मुलगी आणि यमराजाची बहीण आहे. अर्घ्य देताना यमुनेच्या पाण्याचे थेम्ब टाकल्याने या दोन्ही देवता शीघ्र प्रसन्न होतात. 
  • तुम्ही जेव्हा केव्हा यमुनेचे दर्शन घ्याल, तेव्हा आठवणीने एका बाटलीतून यमुनेचे पाणी घरी घेऊन या. जेव्हा जेव्हा सूर्यदेवाला अर्घ्य द्याल, तेव्हा या पाण्याचे थेंब अवश्य टाका. 
  • हा उपाय केल्याने तुमच्या बरोबरच तुमच्या कुटुंबालाही अकाली मृत्यू येणार नाही आणि हर तऱ्हेच्या आजारातून सूर्यदेव तुमची सुटका करतील. 
टॅग्स :Astrologyफलज्योतिष