शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

Astrology Tips: आयुष्यात दारिद्रय बघायचे नसेल तर 'या' चुका कधीही करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 7:00 AM

Astroloy Tips: कर्माचे भोग तर प्रत्येकाला भोगावेच लागतात, मात्र ज्योतिष शास्त्रानुसार काही चुकांमुळे भोग आपण ओढवून घेतो; कोणत्या ते पहा!

पैसे कमवण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात पण काही चुका करतात ज्यामुळे कष्टाने कमवलेला पैसाही टिकत नाही. धर्म पुराण, वास्तुशास्त्र इत्यादींमध्ये या चुका, वाईट सवयींबद्दल माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून व्यक्तीला त्रास, आर्थिक नुकसान, आरोग्य समस्या इत्यादीपासून वाचवता येईल. आज आपण खाण्याशी संबंधित वाईट सवयींबद्दल जाणून घेऊया ज्या माणसाला गरिबीकडे घेऊन जाऊ शकतात .

ताटात मीठ सोडणे फारच अशुभ आहे

मीठ हे समुद्रातून उत्पन्न होते. लक्ष्मीदेखील समुद्रातून आली आहे. त्यामुळे मीठ हा लक्ष्मीचा भाऊ. त्याचा अपमान झाल्यास लक्ष्मी रुष्ट होते. तसेच जेवताना ताटात मीठ तसेच टाकल्याने अन्नपूर्णादेखील रुष्ट होते. अन्नपूर्णा हे देखील देवीचे रूप आहे. म्हणून तिची नाराजी दारिद्रयाचे कारण बनते. त्यामुळे नेहमी जेवढे हवे तेवढेच अन्न तसेच मीठ ताटात घ्या. मीठ शेवटी उरले किंवा जास्त झाले असेल तर मिठावर पाणी टाकून मनोमन अन्नपूर्णेची माफी मागावी. त्यामुळे अन्नपूर्णा आणि लक्ष्मी मातेची अवकृपा होण्याचे प्रमाण कमी होते. 

त्याचप्रमाणे आणखीही काही वाईट सवयी - 

काही लोकांना सवय असते की ते बेडवर बसून खातात. असे करणारे लोक नेहमी पैशाच्या तुटवड्याला बळी पडतात. इतकंच नाही तर शास्त्रात असंही सांगण्यात आलं आहे की, ही सवय व्यक्तीला कर्जबाजारी करते. ही स्थिती माणसाला गरीब बनवते. पलंगावर बसून जेवणे हा अन्नपूर्णेचा आणि लक्ष्मी मातेचा अपमान समजला जातो. ती जागा आपण बसण्यासाठी, झोपण्यासाठी वापरतो. तिथे आपल्या पायाची माती लागते. ती आपल्या अन्नात जाऊ नये, हासुद्धा विचार त्याला जोडलेला असावा. म्हणून, जेवताना किंवा काहीही खाताना नेहमी जमिनीवर बसा आणि आपले ताट पाटावर, चौरंगावर ठेवा. जमिनीवर ताट ठेऊन अन्न खाणे देखील चांगले मानले जात नाही. त्यामुळे सूक्ष्म जीव जंतू ताटात जाण्याची भीती असते. 

अनेकांना दाताने नखं कुरतडण्याची वाईट सवय असते, त्यामुळे रोगराई तर होतेच पण दारिद्रयही येते. शिवाय कापलेली नखे घराबाहेर किंवा कचरा कुंडीत न टाकता घरात पडली, तर घरात अकारण वाद विवाद वाढतात आणि शांतता भंग होते!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष