प्रेमाची व्याख्या आपल्या सर्वांसाठी वेगळी असू शकते. ती व्यक्ती परत्वे बदलू शकते. काही लोकांना वाटते की त्यांच्या प्रेमाने त्यांना कुठलीह गोष्ट करण्यासाठी प्रेरित करावे. पुढे घेऊन जावे. तर काहींना आपल्या प्रेमाकडून सुरक्षिततेची अपेक्षा असते. यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी नात्यात येण्याचे कारण वेगवेगळे असू शकते. प्रत्येक व्यक्ती, तिच्या विचार करण्याच्या क्षमतेनुसार, आपल्या साथिदाराकडून प्रेमाची अपेक्षा करत असते. तर जाणून घेऊयात, आपली राशी कशा प्रकारचे प्रेम शोधते आणि कसा लाइफ पार्टनर असेल आपल्यासाठी खास...?
मेष - उग्र आणि भावुक प्रेम या राशीच्या व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करते. अशा प्रेमात, या व्यक्ती अखंड बुडून हरवून जाऊ इच्छितात.
वृषभ - कोमल मनाचे असल्याने साधारण आणि कोमल पद्धतीने होणारे प्रेम वृषभ राशीला आपल्याकडे आकर्षित करेल.
मिथुन- असे प्रेम जे त्यांना आतून लहान मुलासारखे वाटेल. असे प्रेम जे त्यांना निर्दोष, शुद्ध आणि स्वतंत्र वाटेल. ते मिथुन राशीला आकर्षित करेल.
कर्क - या राशीचे लोक मनापासून प्रेम करणारे असतात. जिथे प्रेम, आदर आणि बांधिलकी असणे खूप महत्वाचे आहे.
सिंह - एक अशा प्रकारेच प्रेम आहे, जे आपल्या जोडिदाराची प्रचंड प्रशंसा करते. तसेच एक चांगली व्यक्ती होण्यासाठी प्रोत्साहित करते.
कन्या - अशा प्रकराचे प्रेम त्यांना स्वतःला आणखी उत्तम बनविण्यासाठी मदत करते. जे यांना भावनिक आणि बौद्धिक दृष्ट्या उत्तर बनवते. असेच प्रेम कन्या राशीला आकर्षित करेल.
तुला - या राशीच्या लोकांना खूप खोलवर प्रेमाची इच्छा असते. हे लोक त्यांच्या आयुष्यात त्यांची विशेष काळजी घेणारे प्रेम पसंत करतात. वृश्चिक - या राशीच्या लोकांना एखाद्या परीकथे प्रमाणे असेलले नाते आवडते. जिथे सर्व काही द्वेषाने सुरू होऊन प्रेमात रुपांतरित होते.
धनु - धनु राशीचे लोक मोकळ्या मनाने जगणाऱ्या लोकांसोबत प्रेम करतात. त्यांना प्रवास करण्याची आणि जगाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आकर्षित करते.
मकर - या राशीचे लोक अशा व्यक्तीसोबत राहणे पसंत करतात, ज्या त्यांना त्यांच्या जगाचा एक महत्वपूर्ण भाग वाटतात. जेथे त्यांना ऐकूण आणि पाहून कळेल.
कुंभ - या राशीच्या लोकांना अशा नात्याचा भाग होणे आवडते, ज्यात ते आपले सर्वस्व देऊ शकतील. ते ज्या व्यक्तीवर प्रेम करतात तिच्यासाठी काहीही करू शकतात.
मीन - या राशीच्या व्यक्तींना आपल्या जीवनात असे प्रेम हवे असते, जेथे त्यांचा पार्टनर सर्वप्रथम त्यांचे क्रश असेल. जो नंतर, एका सुंदर प्रेमाच्या कहाणीत रुपांतरित होतो.