जगाला शांतता आणि अहिंसेचा पाठ पढवणारे भगवान बुद्ध यांना बौद्ध धर्माचा संस्थापक मानले जाते. त्यांचे अनमोल विचार आचरणात आणून आपणही जगाला प्रेम, शांतता, एकता, सबुरी देण्याचा प्रयत्न करूया.
- ज्याला हेतुपुरस्सर खोटे बोलण्यास लाज वाटली नाही, ते कोणत्याही प्रकारचे पाप करू शकतात आणि त्याबद्दल त्यांना कधीच दिलगिरी वाटत नाही. ही वाईट सवय आपल्याला लागू नये असे वाटत असेल, तर चुकूनही अगदी मजा मस्करीतही कोणाशी खोटे बोलू नका.
- सत्य हेच शाश्वत आहे. परंतु अनेक लोक माणसामाणसांत भेद निर्माण करून माणुसकीत दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आपण मात्र समस्त सृष्टीकडे समतेने पाहण्याचा आणि माणुसकीने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- सत्यवाणी म्हणजे अमृतवाणी, सत्यवाणी हा शाश्वत धर्म आहे. जे सत्य आहे त्याचाच नेहमी विजय होतो. आजूबाजूला कितीही वाईट घडत असले, तरी चांगुलपणाचा विजय होणार याची खात्री बाळगा आणि स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा.
- असत्य बोलणारी व्यक्ती कधीच सुखी राहू शकत नाही. याउलट सत्य बोलणारी व्यक्ती कधीच भयभीत राहत नाही.
- जो दुसऱ्याला फसवू शकतो, तो आपल्या घरच्यांनाही फसवू शकतो. पण तो स्वतःला फसवू शकत नाही. त्याचे मन त्याला स्वस्थ बसू देत नाही. यासाठी नेहमी खरे बोलण्याची सवय लावून घ्या.
- स्वतः खोटे बोलू नका आणि इतरांना खोटे बोलण्यास प्रवृत्त करू नका. किंवा कोणी खोटे बोलत असल्यास त्याला दुजोरा देऊ नका, सहमती दर्शवू नका. तसे करणे म्हणजे त्याच्या पापात तुम्हीदेखील सहभागी होण्यासारखे आहे.
- दुसऱ्यांवर विजय मिळण्याआधी स्वतःवर विजय मिळवा. लोक तुम्हाला पराजित करतीलही, पण तुम्ही स्वतःची लढाई जिंकलेली असेल, तर तुम्हाला इतरांकडून पराभूत झाल्याचे दुःख होणार नाही.
- हजारो निरर्थक शब्दांपेक्षा चांगला शब्द म्हणजे शांतता.
- समाधानी असणे ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हा सर्वात मोठा नातेसंबंध आहे आणि आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे.
- जेव्हा जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपण सत्याचा मार्ग सोडतो.
- स्वतः शांततेने जगा आणि इतरांना शांततेने जगू द्या. जगाला प्रेमाची, सहकार्याची आणि शांततापूर्ण जीवनशैलीची गरज आहे. ती अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करा.