शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
2
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
3
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
4
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
5
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
6
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
7
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
8
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
9
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
10
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
11
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
12
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
13
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
14
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
15
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
16
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
17
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
18
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
20
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

गीताई माऊली माझी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 5:27 PM

जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी सांगितलेले जीवनावश्यक तत्वज्ञान म्हणजे युद्धभूमीवरील गीता ग्रंथ होय.

भारतीय ग्रंथ सारस्वतामध्ये सर्वांचा मुकूटमणी म्हणून कोणता ग्रंथ असेल तर भगवद् गीता होय. प्राचीन  भरतवर्षातील या ग्रंथाने मानवी जीवन कसे जगावे याचा आदर्श वस्तुपाठच विशद केला आहे. अर्जुन या ग्रंथाचा नायक असून भगवान श्रीकृष्ण या ग्रंथाचे महानायक आहेत.  आपल्या प्राणसख्या असणा-या अर्जुनाला ते  त्याच्या जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी सांगितलेले जीवनावश्यक तत्वज्ञान म्हणजे युद्धभूमीवरील गीता ग्रंथ होय. मानवी जीवनसुद्धा एक युद्धभूमी असून प्रत्येकाला आपले जीवनप्रश्न व समस्या सोडविण्यासाठी एका आदर्श मार्गदर्शकाची आवश्यकता असते. ख-या ज्ञानाची गरज भासते. मानवी जीवन  हे जेंव्हा काय करावे? व  काय करू नये? अशा  द्वंवद्ववामध्ये सापडते तेव्हा कोणता विचार अंगिकारावा  हा प्रश्न पडतो. त्यावेळी एकच भगवद्गीता विचार आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर शोधुन देऊ शकतो. मानवी जीवनात  उत्पन्न होणा-या अनेक परस्थितीतींची व प्रश्नांची उत्तरे  या ग्रंथातून प्राप्त होतात. म्हणून प्रत्येकाने  हा गीता विचार अंगीरावा. मानवाला जेव्हा आपले शरीर आणि मन यांच्या माध्यमातून अनेक दुःख आणि अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा त्याने भविष्यकाराला आपला हात दाखविण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णांना शरण जावून भगवद्गीतेतील परमेश्वरासोबत असलेल्या आपल्या वास्तविक संबंधाना समजून घेण्याची खरी वेळ जीवनात आलेली असते.  

भगवगद्गीता ही सर्वांची माउली असून, सर्वांना आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय काय? ते प्राप्त करण्यासाठी तू कोणते कर्म करीत आहेस ?  असा प्रश्न विचारीत असते  व त्या सर्व प्रश्नांना सोडविण्यासाठी सदोदीत मार्ग दाखवित असते. गीतेचा कर्मसिद्धांत हा मानवी जीवनाला मिळालेला अमृतकुंभच होय.  त्या एका सिंद्धाताचे  पालन जरी प्रत्येकाने केले तर आज मानवी जीवनातील असंख्य समस्यांना निश्चितच उत्तर सापडेल. भगवान श्रीकृष्णांनी  अर्जुनाला सुद्धा तोच महत्त्वाचा विचार सांगितला होता. तू तुझे नियत कर्म कर; परिस्थीती कोणतीही असो.  

यत्र योगेश्वर कृष्ण: यंत्र पार्थ धनुर्धर:।

तत्र श्रीविजयो भूतिरध्रुवा नितीर्ममतीम।।

 अर्जुनाने जेव्हा युद्धामध्ये  माझ्या समोर  माझे  काका, मामा, गुरू आहेत.  युद्ध कसा करू?  असा  प्रश्न केला तेव्हा  श्रीकृष्णांनी  आपल्या समोर आलेल्या परिस्थितीचा सामना तू कर असे सांगीतले. तुझे कर्मच तुला तुझ्या समस्येचे निराकरण करणारे आहे. 

यत्करोषि यदक्श्र्नासि ददासि यत् ।

यत्पस्यासि कौन्तेय तत्कुरुष्व सदर्पणम।। गीता (९/२७ )

स्वतःच्या कर्मानेच मनुष्य हा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत असतो. स्वकर्मेच  त्याला विशिष्ट ठिकाणी पोहोचवत असतात. ज्ञानप्राप्तीनंतर जशी कर्माची चिंता उरत नाही, त्याप्रमाणेच जीवनामध्ये कर्मयोगाला जर आत्मज्ञानाची जोड दिली, तर जीवन कृतकृत्य होते.  जेव्हा मनुष्य आपले जीवनाचे मुळ ध्येय विसरतो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या मुळ ध्येयाची पुनर्स्थापना करण्यासाठी अवतार घेतात. हा गीतेतील महत्त्वाचा विचार लक्षात घेण्यासारखा आहे. गीतेमध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म या पाच तत्वांचे महत्त्वाचे विस्तृत वर्णन आलेले आहे. पहिले चार तत्त्व जरी मानवी जीवन शक्तीच्या बाहेरील असले तरी. मनुष्याने कर्ममार्गाचे आचरण करावे. ईश्वराने दिलेले नियत जीवनमान योग्य कर्म करून  जीवन आनंदीत करण्यासाठी आहे. रडत बसण्यापेक्षा नियत कर्म करा, हा सिद्धांत जर सर्वांनी अंगिकारला तर जीवनातील  असंख्य प्रश्नांना  उत्तरे आपोआपच सापडतात. हा गीताविचार सर्वांनी समजून घेणे ही काळाची गरज आहे.

कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषु कदाचन । 

मा कर्मफलेहेतूर्भूर्मा ते संङगोSस्तवकर्मणी  ।। २/४७

हा जीवनकर्मविचार केवळ एक विचार नसून ती आपल्याला भगवान श्रीकृष्णांसारख्या  प्रभूंनी दिलेला जीवनसुखमयतेचा महत्त्वाचा संदेश आहे. संत ज्ञानेश्वर माउलींनी कर्माची महती आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगीतली आहे. 

एरवी जग हे कर्माधीन । ऐसि याची व्याप्ती गहन । 

परी ते असो आईके चिन्हं प्राप्ताचे गा ।। ( ज्ञाने. ४/९२)

जग  तुम्हाला कधीही लक्षात ठेवत नाही तर तुम्ही केलेल्या कर्मांनाच आठवत असते. मग ते कर्म तुम्हाला चांगले म्हणून ओळखतात किंवा  वाईट म्हणून ओळखतात. त्यासाठी कर्मविचारच  गीताई माउलीचा जीवनविचार आहे. असे या श्लोकातून  गीताई आपल्याला संदेश देत आहे.

यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।

यज्ञो दानं तपश्चैव पावनानी मनीषिनाम।। ( गीता १८/५)

श्रीमद् भगवद्गीता ग्रंथ आनंदचिद्घन, ऐश्वर्याने परिपूर्ण चराचरा ने वंदन केलेल्या परम पुरुषोत्तम साक्षात भगवान श्रीकृष्णांची दिव्य वाणी आहे . अत्यंत रहस्त्याने भरलेली आहे. परमदयाळू श्रीकृष्णांच्या कृपेने जे पुरुष श्रद्धा आणि प्रेमळ विशुद्ध भक्तीने आपल्या अंतकरण भरून भगवद्गीतेचे मनन करतात तेच या गीतेच्या स्वरूपाचे काही अंशी दर्शन घेऊ शकतात. म्हणून 

स्वकल्याण इच्छिणाऱ्या स्त्री-पुरुषांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनचा आदर्श पुढे ठेवून स्वतः मध्ये अर्जुनासारखे दैवी गुण बाणवून श्रद्धा भक्तिपूर्वक गीतेचे श्रवण मनन अध्ययन करावे आणि भगवंताचा खूप आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.

- डॉ. हरिदास आखरे

टॅग्स :spiritualअध्यात्मिक