बुद्ध पौर्णिमा मे 2021: २६ मे रोजी वैशाख पौर्णिमा आहे. या दिवशी महात्मा बुद्धांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. भगवान बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला. त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांचे अनुयायी त्यांच्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतात. होतकरू विद्यार्थ्यांना किंवा गरजू संस्थांना दान देणगी देतात. बुद्ध पौर्णिमेला वैशाख पौर्णिमेच्या दृष्टिकोनातून गंगा स्नानाला महत्त्व आहे.
असे मानले जाते की महात्मा बुद्ध हा श्री हरि विष्णूचा नववा अवतार आहे. बौद्ध बांधव बुद्ध पौर्णिमा हा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरी करतात. चला, जाणून घ्या शुभ वेळ, उपासना करण्याची पद्धत आणि ग्रह नक्षत्रांची स्थिती ...
बुद्ध पौर्णिमा तारीख - पौर्णिमेची तिथी २५ मे रोजी मंगळवारी रात्री ०८.३० पासून सुरू होईल आणि बुधवार २६ मे रोजी ४.४३ मिनिटांनी पूर्ण होईल.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जुळून येत आहे अपूर्व योग -
यावर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रात्री १० वाजून ५२ मिनिटांपर्यंत शिवकाळ असेल. यानंतर सिद्ध योग सुरू होईल. ज्योतिषशास्त्रानुसार सर्वार्थ सिद्धि योग कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी शुभ आहे. शुभ कार्यासाठी जर शुभ मुहूर्त मिळाला नाही, तर तो या योगाद्वारे केला जाऊ शकतो. असे मानले जाते की या दोन शुभ योगात केलेले कार्य यश देते.
सूर्य आणि चंद्र स्थिती
ब्रह्म मुहूर्त पहाटे ३.४५ ते पहाटे ४. ३५विजय मुहूर्त दुपारी २. २० ते ३. १६ संध्याकाळी ७.५ मिनिटांपर्यंत गोधूलि मुहूर्त आहे. पहाटे ४.०८ ते ०५. ३२ मिनिटांपर्यंत अमृत काळआहे. सर्वार्थ सिद्धि योग पहाटे ५. १७ मिनिटांपासून रात्री १.१६ दरम्यान आहे. अमृत सिद्धि योग २७ मे रोजी सकाळी ०५.१७ ते दुपारी १.१६ पर्यंत आहे.
वैशाख पौर्णिमेचे महत्त्व
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानास विशेष महत्त्व आहे. या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत स्नान केले जाते. नदीत स्नान शक्य नसेल तर रोजचे आंघोळीचे पाणी घेताना पवित्र नद्यांचे स्मरण करून स्नान केले जाते. यानंतर श्री हरि विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी धर्मराजाची उपासना केली जाते. धर्मराज मृत्यूचे देव आहेत, म्हणूनच सत्यविनायक व्रताने त्यांना प्रसन्न केले जाते. असे मानले जाते की पौर्णिमेच्या दिवशी तीळ आणि साखर दान करणे शुभ आहे. या दिवशी साखर आणि तीळ दान केल्यामुळे अज्ञात पापांमधूनही मुक्तता मिळते.