शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

Buddha Purnima 2023: भगवान बुद्धांनी अनुभवली ती श्रीमंती तुम्हालाही अनुभवयाची आहे? वाचा ही प्रेरक कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 7:00 AM

Buddha Purnima 2023: श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, मात्र श्रीमंतीचा खरा मार्ग कोणता ते बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने भगवान बुद्धांच्या प्रेरक कथेतून जाणून घेऊया!

एकदा एक शिष्य भगवान बुध्दांजवळ आला आणि म्हणाला, 'भगवान, मी श्रीमंत का नाही?'भगवान म्हणाले, 'कारण तू उदार नाहीस!'शिष्य म्हणाला, 'भगवान, उदार तीच व्यक्ती असते, जी श्रीमंत असते. मी दरिद्री कसली उदारता दाखवणार?'भगवान म्हणाले, 'दरिद्री? तू तर श्रीमंत आहेस. तूच नाही, जगातली प्रत्येक व्यक्ती श्रीमंत आहे. कारण प्रत्येकाकडे पाच रत्न आहेत.'शिष्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला, 'रत्न आणि माझ्याजवळ? कोणती रत्न भगवान? कृपया सविस्तर सांगा.' भगवान स्मित वदनाने सांगू लागले... 

'पहिले रत्न, स्मित हास्य. लोकांकडे एवढे प्रश्न आहेत, समस्या आहेत की ते हसणे विसरले आहेत. तुझ्याकडे हास्य आहे. ते तू देऊन बघ. तुला पाहून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित आल्यावाचून राहणार नाही. एक स्मित हास्य समोरच्याला क्षणभर का होईना दुःख विसरायला भाग पाडते. 

' दुसरे रत्न, डोळे. या डोळ्यांनी आपण जगाकडे पाहतो. पण आपली नजर स्नेहार्द्र असेल, तर केवळ नजरेने समोरच्याला दिलासा मिळू शकतो. आश्वासक नजर फार महत्त्वाची असते. ती नजर कोणाला सकारात्मकता तर कोणाच्या जगण्याला बळ देते. नजरेत प्रेम, माया, वात्सल्य, सहानुभूती असे अनेक भाव दडलेले असतात. अशा प्रेमळ नजरेसाठी अनेक जण आसुसलेले आहेत. 

'तिसरे रत्न, जीभ. ही केवळ विविध पदार्थांचे रस चाखण्यासाठी नाही, तर चांगले बोलण्यासाठी देखील वापरली पाहिजे. आपल्या बोलण्याने दुसऱ्याला प्रोत्साहन देता आले, विश्वास देता आला, कौतुक करता आले, तर त्याचा सकारात्मक परिणाम दुसऱ्याच्या आयुष्यावर नक्कीच होऊ शकतो. म्हणून चांगले बोला. खोटे कौतुक किंवा खोटी प्रशंसा नाही, तर जगायला बळ देणारे दोन शब्द पुरेसे असतात. 

'चौथे रत्न, हृदय. तुमच्या हृदयात दुसऱ्यांबद्दल केवळ मत्सर, राग, द्वेष आणि अहंभाव भरलेला आहे. या गोष्टी हृदयाला उपयोगाच्या नाहीत. उलट त्या हानिकारक आहेत. त्या काढून टाकून हृदयाची जागा प्रेमाने भरून टाका. ज्याचे हृदय प्रेमाने, आनंदाने भरलेले असेल, तोच दुसऱ्याला प्रेम आणि आनंद देऊ शकेल.'

'पाचवे रत्न, शरीर. आपल्याला मिळालेल्या सुदृढ शरीराचा वापर केवळ स्वतः साठी न करता दुसऱ्यांसाठी सुद्धा करा. जेव्हा तुम्ही लोकोपयोगी ठराल, तेव्हा त्या जाणिवेने तुम्ही अधिकाधिक समृद्ध व्हाल. ही जाणीव म्हणजे खरी श्रीमंती! आता मला सांग, ही पाच रत्न तुझ्याजवळ असताना तू गरीब आहेस की श्रीमंत?'

शिष्य उत्तरला, 'भगवान माझ्या श्रीमंतीची तुम्ही मला जाणीव करून दिलीत. या रत्नांचा मी सदुपयोग करेन आणि दुसऱ्यांनाही त्याची जाणीव करून देईन. सगळ्यांना या रत्नांची ओळख झाली आणि प्रत्येकाने त्याचा योग्य वापर करायचा ठरवला, तर हे जगच किती श्रीमंत होईल नाही?'

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा