शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

Buddha Purnima 2023: बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली असता भगवान बुद्धांना प्रिय ठरेल? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 07:00 IST

Buddha Purnima 2023: ५ मे रोजी बुद्ध पौर्णिमा अर्थात भगवान बुद्धांची जयंती आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशा गोष्टी करा ज्या त्यांना प्रिय ठरतील आणि तुम्हालाही आनंद देतील!

असे मानले जाते की भगवान बुद्ध यांचा जन्म हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता आणि त्यांना या दिवशीच बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. म्हणून आजचा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा केला जातो. भारत आणि जगात बरीच संयुक्त मंदिरे आहेत जी भगवान बुद्ध आणि विष्णू यांना समर्पित आहेत. जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. चला उत्सवाची परंपरा जाणून घेऊया. यंदा ५ मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. 

१. भगवान बुद्ध यांचा जन्मदिन म्हणून वैशाख पौर्णिमेच्या दिवशी खीर केली जाते आणि खीर भगवान बुद्धांना अर्पण केली जाते. 

२. आजच्या दिवशी बौद्ध प्रार्थना स्थळ फुलांनी सजवले जाते व बौद्ध प्रार्थनांचे आयोजन केले जाते.

३. सूर्योदयाच्या अगोदर प्रार्थना स्थळांवर सर्व अनुयायी एकत्र जमतात. भजन, वाचन, गायन करून जयंती साजरी करतात. 

४. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानंतर बौद्ध प्रार्थना स्थळांवर बौद्ध ध्वज फडकविला जातो. हा ध्वज निळा, लाल, पांढरा, पिवळा आणि केशरी रंगाचा असतो. लाल आणि निळा रंग आशीर्वादाचा, पांढरा रंग धर्म शुद्धतेचे प्रतीक, केशरी रंग बुद्धिमत्तेचे प्रतीक आणि पिवळा रंग कठीण परिस्थितीतून जगण्याचे प्रतीक मानला जातो. 

५. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी अनेक गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र दान केले जाते. 

६. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काहीजण पक्षी व पिंजऱ्यात कैद असलेल्या प्राण्यांना मुक्त करून हा दिवस साजरा करतात.

७. या दिवशी भगवान बुद्ध यांचे अनुयायी घरात दिवे लावतात आणि घर फुलांनी, दीपमाळांनी सजवले जाते. 

८. जगभरातील बौद्ध अनुयायी आजच्या दिवशी बोधगया येथे जातात आणि प्रार्थना करतात.

९. भगवान बुद्ध यांच्या चरित्राचे त्यांच्या शिकवणुकीचे सामूहिक वाचन, चिंतन करतात. 

१०. आजच्या दिवशी भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, म्हणून आजच्या दिवशी बोधी वृक्षाचे पूजन केले जाते. 

१२. भगवान बुद्धांचे अनुयायी आजच्या दिवशी मांसाहार व्यर्ज करतात. कारण भगवान बुद्ध हिंसेच्या विरुद्ध होते. 

१३. आजच्या दिवशी बौद्ध धर्मगुरुंकडून सर्व अनुयायांना भगवान बुद्धांनी दिलेल्या शांतिमय जीवनाचे स्मरण करुन दिले जाते आणि त्यांनीही शांततेचा मार्ग अनुसरावा अशी शिकवण दिली जाते. 

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा