ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ग्रहाचे एका राशीतून दुस-या राशीत संक्रमण सर्व १२ राशींवर परिणाम करते. बुद्धीचा कारक बुध ग्रह १३ मे पर्यंत वृषभ राशीत राहणार आहे. आणि त्यानंतर अस्ताला जाणार आहे. २ जुलै रोजी तो मिथुन राशीत प्रवेश करेल. या संक्रमणामुळे बुध संक्रमणाचा प्रभाव तीन राशींवर सर्वाधिक दिसून येईल. करिअरमध्ये यश, आर्थिक सुबत्ता आणि नवीन जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टी मिळू शकतात.
मेष- मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण लाभदायक ठरू शकते. बुधामुळे तुमच्या शब्दाला किंमत येऊन तुमचा भाव वधारणार आहे. त्यामुळे, संक्रमण कालावधीत तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात नवनवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिक जोडीदाराशी नाते दृढ होऊन व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे करिअरमध्ये विशिष्ट उंची गाठता येईल. बुध तुमच्या राशीच्या तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. हित शत्रूंचा पराभव होईल. त्यामुळे हा काळ तुमच्या करिअरच्या विकासाचा आहे असे समजून जोमाने कामाला लागा.
कर्क- कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ राहील. बुध ग्रहाने तुमच्या राशीच्या ११ व्या घरात प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे संक्रमण तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ११ वे घर लाभ आणि उत्पन्नाचे स्थान आहे. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. करिअरमध्ये यश मिळू शकते. जोडीदाराबरोबर नात्यात गोडवा राहील. तुमच्या राशीच्या चौथ्या घराचा स्वामी बुध आहे. ज्याला मातृ स्थान, सुख आणि वैभव प्राप्तीचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुम्हाला आईचा पाठिंबा राहील तसेच मालमत्ता खरेदीची संधी मिळेल. भविष्याचा विचार करता या काळात तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करू शकता.
सिंह- सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण फायदेशीर ठरेल. तुमच्या राशीच्या दहाव्या भावात बुध ग्रहाचे भ्रमण झाले आहे. ज्याला कार्यक्षेत्र आणि नोकरीचे ठिकाण म्हणतात. याकाळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमच्या राशीचा अधिपती ग्रह सूर्य देव आहे. सूर्य आणि बुध यांच्यातील मैत्रीमुळे, हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल. बुधामुळे कर्तृत्त्व आणि सूर्यासारखे तळपण्याची संधी देणारा हा काळ आहे!