शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 10:42 AM

Budh Pradosh 2024: कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमेचा काळ महादेवाच्या आराधनेचा, अशातच आजचे प्रदोष व्रत सर्वार्थाने महत्त्वाचे!

दर महिन्याला कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. या व्रताचे अनेक लाभ आहेत. बुधवारी येणार्‍या प्रदोष तिथीला बुध प्रदोष म्हटले जाते. आज १३ नोव्हेंबर रोजी बुध प्रदोष (Budh Pradosh 2024) आहे आणि १५ नोव्हेंबर, अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यन्त (Tripuri Purnima 2024) शिव उपासनाही आपल्याला करायची आहे. आचरण करण्यासाठी अतिशय सोपे असे हे व्रत कसे करायचे ते जाणून घेऊ आणि महादेवाच्या कृपेने बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी प्रार्थना करू. 

प्रदोष विशेष शिव उपासना : 

सनातन धर्मात प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले जाते. या दिवशी, प्रदोष काळात, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. सश्रद्ध मनाने महादेवाची आराधना केल्याने मनुष्याला शुभफळ प्राप्त होते, अशी धार्मिक धारणा आहे. तसेच भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आशीर्वाद सदैव राहतो. ३ जुलै रोजी प्रदोष आहे. ही तिथी बुधवारी आल्याने याला बुध प्रदोष व्रत म्हटले जाईल.

पुजा विधी : 

प्रदोष व्रताचे पालन करण्यासाठी शक्यतो पूर्ण दिवस उपास करावा आणि संध्याकाळी व्रत पूर्ती झाल्यावर उपास सोडावा. ज्यांना शक्य नाही, त्यांनी शाकाहार घ्यावा. सायंकाळी स्नान करून, धुतलेले वस्त्र घालून शिव मंदिरात जावे, अथवा घरच्या शिवपिंडीला दूध-पाण्याचा अभिषेक करावा. आपल्या समस्या महादेवाला सांगून त्या निवारण करण्यासाठी प्रार्थना करावी. पुढे दिलेले स्तोत्र म्हणावे आणि व्रत पूर्ती करून देवाला दुधाचा नैवेद्य दाखवावा आणि बेलाचे पान तसेच पांढरे फूल वाहून नमस्कार करावा. 

बुध प्रदोष व्रत शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, १३ नोव्हेंबर  २०२४ रोजी हे व्रत सूर्यास्ताच्या वेळी अर्थात सायंकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान करायचे आहे आणि पुढील शिवस्तुती म्हणायची आहे. 

शिव स्तुति मंत्र (Shiv Stuti Ka Path)

पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यम।जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिम।1।महेशं सुरेशं सुरारातिनाशं विभुं विश्वनाथं विभूत्यङ्गभूषम्।विरूपाक्षमिन्द्वर्कवह्नित्रिनेत्रं सदानन्दमीडे प्रभुं पञ्चवक्त्रम्।2।गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गवेन्द्राधिरूढं गुणातीतरूपम्।भवं भास्वरं भस्मना भूषिताङ्गं भवानीकलत्रं भजे पञ्चवक्त्रम्।3।शिवाकान्त शंभो शशाङ्कार्धमौले महेशान शूलिञ्जटाजूटधारिन्।त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप: प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप।4।परात्मानमेकं जगद्बीजमाद्यं निरीहं निराकारमोंकारवेद्यम्।यतो जायते पाल्यते येन विश्वं तमीशं भजे लीयते यत्र विश्वम्।5।न भूमिर्नं चापो न वह्निर्न वायुर्न चाकाशमास्ते न तन्द्रा न निद्रा।न गृष्मो न शीतं न देशो न वेषो न यस्यास्ति मूर्तिस्त्रिमूर्तिं तमीड।6।अजं शाश्वतं कारणं कारणानां शिवं केवलं भासकं भासकानाम्।तुरीयं तम:पारमाद्यन्तहीनं प्रपद्ये परं पावनं द्वैतहीनम।7।नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते नमस्ते नमस्ते चिदानन्दमूर्ते।नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिज्ञानगम्।8।प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ महादेव शंभो महेश त्रिनेत्।शिवाकान्त शान्त स्मरारे पुरारे त्वदन्यो वरेण्यो न मान्यो न गण्य:।9।शंभो महेश करुणामय शूलपाणे गौरीपते पशुपते पशुपाशनाशिन्।काशीपते करुणया जगदेतदेक-स्त्वंहंसि पासि विदधासि महेश्वरोऽसि।10।त्वत्तो जगद्भवति देव भव स्मरारे त्वय्येव तिष्ठति जगन्मृड विश्वनाथ।त्वय्येव गच्छति लयं जगदेतदीश लिङ्गात्मके हर चराचरविश्वरूपिन।11।

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२४