वास्तू किंवा नवीन जागा पाहताना आपण केवळ ती जागा नाही तर संबंधित परिसराचेही अवलोकन करतो. कारण आपल्या सभोवतालच्या परिसराचा आपल्या राहणीमानावर, व्यक्तिमत्त्वावर, मनावर सखोल परिणाम होत असतो. यासाठी वास्तूची किंवा जागेची खरेदी चोखंदळपणे करणे इष्ट ठरते.
घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते, घर खरेदी करताना किंवा बांधताना वास्तूच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास वास्तू दोषाच्या अनेक समस्या निर्माण करतात. तुम्हीही नवीन वर्षात घर बांधण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे वास्तू नियम तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
>>दक्षिणाभिमुख असलेले घर शुभ मानले जात नाही. अशा परिस्थितीत घर बांधताना किंवा खरेदी करताना वास्तूच्या या नियमाची विशेष काळजी घ्या. जर घर दक्षिणाभिमुख असेल तर वास्तू दोष दूर करण्यासाठी वास्तु तज्ञाचा सल्ला घ्या.
>>घराचा मुख्य दरवाजा उत्तर, ईशान्य किंवा पश्चिम दिशेला असणे शुभ मानले जाते. दुसरीकडे, दक्षिण, दक्षिण-पश्चिम, उत्तर-पश्चिम किंवा दक्षिण-पूर्व दिशेला मुख्य द्वार असणे अशुभ आहे.
>>सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा नसलेल्या ठिकाणी घर घेणे टाळा. वास्तूनुसार अशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते. याशिवाय संबंधित जागेच्या परिसरात काटेरी झाडे किंवा खड्डे नसावेत. कारण अशा जमिनीवर घर बांधणे शुभ मानले जात नाही.
>>वास्तुशास्त्रानुसार घरासमोर काटेरी झाड, उकिरडा किंवा पडकी घरे असणे अशुभ आहे. यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. त्यामुळे घरातील लोकांची प्रगती थांबते.
>>घराला लागून नैऋत्य दिशेला विहीर किंवा तलाव असणे देखील अशुभ आहे. याशिवाय काटेरी झाडं किंवा खड्डे असू नयेत. यामुळे वास्तुदोष निर्माण होतात.