शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

Angarki Sankashti Chaturthi 2022: नववर्षाच्या पहिल्या संकष्टीला अंगारकी योग: चंद्रोदयाची वेळ काय? पाहा, शुभ मुहूर्त व महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:22 PM

Angarki Sankashti Chaturthi 2022: अंगारक चतुर्थी व्रताचरणाने २० संकष्ट चतुर्थी, तर अंगारकीला केलेला उपवासाने १२ संकष्ट चतुर्थीचे पुण्य मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या पूजनाने होते. हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी बाप्पाला प्रार्थना केली जाते. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती व्रत केले जाते. यातील वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) व्रत करण्याची प्राचीन परंपरा सुरू आहे. मंगळवारी संकष्ट चतुर्थी आली की, त्यावेळी अंगारक योग जुळून येतो, असे सांगितले जाते. हिंदू नववर्षाच्या पहिल्याच संकष्ट चतुर्थीला अंगारक योग (Angarki Sankashti Chaturthi 2022) जुळून आला आहे. हा अतिशय शुभ योग मानला गेला आहे. एप्रिल महिन्यातील चैत्र अंगारक संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... (Chaitra Sankashti Chaturthi April 2022)

गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारक चतुर्थी’ म्हणतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण दर महिन्यात करतो, परंतु अंगारक चतुर्थीचे महत्त्व अधिक असते कारण हा योग वारंवार येत नाही. विशेष म्हणजे हिंदू नववर्षातील पहिलीच संकष्टी अंगारकी संकष्टी असल्याने याचे महत्त्व वेगळे मानले गेले आहे. (Chaitra Angarki Sankashti Chaturthi April 2022 Date)

चैत्र अंगारक संकष्ट चतुर्थी: मंगळवार, १९ एप्रिल २०२२

चैत्र वद्य अंगारक चतुर्थी प्रारंभ: मंगळवार, १९ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजून ३९ मिनिटे.

चैत्र वद्य अंगारक चतुर्थी समाप्ती: बुधवार, २० एप्रिल २०२२ रोजी दुपारी ०१ वाजून ५३ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे आषाढ महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन मंगळवार, १९ एप्रिल २०२२ रोजी करावे, असे सांगितले जाते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी येणारी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते. याविषयीची कथा सर्वज्ञात आहे. अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट्या केल्याचे पुण्य मिळते, अशी काही भाविकांची समजूत आहे, तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते, असेही काहींचे मानणे आहे. म्हणूनच या दिवशी उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. 

असे करावे संकष्ट चतुर्थीचे व्रत 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (Chaitra Angarki Sankashti Chaturthi April 2022 Chandrodaya Timing)

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ३९ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून ३५ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे
वर्धारात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून ३३ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ३५ मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे
नागपूररात्रौ ०९ वाजून २३ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
औरंगाबादरात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता ३७ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे
उस्मानाबादरात्रौ ०९ वाजून ३० मिनिटे
भंडारारात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०९ वाजून २० मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती