शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

Chaitra Navratra 2022 : अनादी निर्गुण प्रगटली भवानी: आज चैत्र गौरीची जन्मतिथी; देवीची भरा ओटी आणि आईकडे मागा जोगवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 2:47 PM

Chaitra Navratri 2022 : ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते. ती कशी भरतात ते पाहू. 

आई जगदंबेच्या विविध रूपांचा आणि शक्तीचा गौरव आपण नवरात्रीच्या निमित्ताने करतो. वर्षभरात तीन नवरात्री केल्या जातात. चैत्र, शारदीय आणि शाकंभरी नवरात्र. सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि त्यात आज अष्टमीचा दिवस आहे. आजची तिथी चैत्र गौरीची जन्मतिथी म्हणून ओळखली जाते. त्यानिमित्त देवीचा जागर आपण करतोच, त्याबरोबरीने आज देवीची खणा नारळाने ओटी भरा आणि देवीची पूजा करून जोगवा सुद्धा मागा. 

Chaitra Navratra 2022 : देवीची शीघ्रकृपा प्राप्त व्हावी, म्हणून चैत्रपंचमीला 'असे' कुंकुमार्चन करा!

पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे, हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संततीप्राप्त व्हावी, म्हणून तिची ओेटी भरली जाते. 'संततीप्राप्ती'च्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते. ती कशी भरतात ते पाहू. 

देवीची ओटी भरताना पाळावयाचे शास्त्र :

देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो. देवीला सहावारी ऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असते. तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी. देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात. त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे. श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी.

आईचा जोगवा अर्थात आईचा आशीर्वाद : 

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोहमहिषासूर मर्दना लागुनी ।त्रिविध तापाची कराया झाडणी ।भक्तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ मी घालीन ।हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा ।करुनी पोटी मागेन ज्ञानपात्रा।धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥पूर्ण बोधाची घेईन परडी ।आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।मनोविकार करीन कुर्वंडी । अद्भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥आता साजणी जाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग ।कामक्रोध हे झोडियेले मांग ।केला मोकळा मारग सुरंग ॥५॥ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।जाउनी महाद्वारी नवस फेडिला ।एकपणे जनार्दन देखिला ।जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥

टॅग्स :Navratriनवरात्री