चैत्र नवरात्रीला काही दिवस उरले आहेत. या वर्षी चैत्र नवरात्र २ एप्रिलपासून सुरू होईल आणि ११ एप्रिलपर्यंत चालेल. ही नवरात्र रामाची नवरात्र म्हणूनही साजरी केली जाते. या नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने विशेष कृपा प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. याच दिवशी एक दुर्मिळ योग जुळून येत आहे चला जाणून घेऊया या चैत्र नवरात्रीला ग्रहांच्या संयोगामुळे कोणते योग तयार होत आहेत आणि कोणते फायदे होतात.
चैत्र नवरात्रीत ग्रहांची स्थितीज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी चैत्र नवरात्रीमध्ये ग्रहांच्या संयोगामुळे विशेष योग तयार होत आहे. वास्तविक या नवरात्रीत मंगळ आणि शनी एकत्र असतील. शनि-मंगळाच्या या संयोगाने चांगली ग्रहस्थिती निर्माण होईल. यासोबतच कामात यश आणि इच्छा पूर्ण होण्याचीही शक्यता आहे. याशिवाय चैत्र नवरात्रीच्या काळात कुंभ राशीमध्ये गुरु आणि शुक्राचा संयोग होत आहे. यासोबतच मेष राशीत चंद्र, वृषभ राशीत राहू, वृश्चिक राशीत केतू आणि मीन राशीत सूर्य आणि बुध राहतील.
हे शुभ योगायोग घडत आहेतपंचांगानुसार चैत्र नवरात्रीमध्ये रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रविपुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सर्वार्थ सिद्धी योग लक्ष्मी मातेशी संबंधित आहे. असे मानले जाते की या योगात कोणतेही काम केल्यास शुभ फळ मिळते. यासोबतच कामात यशही मिळते. तसेच रवियोगात सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की या योगात केलेल्या कामाचे लवकर फळ मिळते.
लक्ष्मीची उपासना
या नऊ दिवसांमध्ये लक्ष्मी मातेचा वरद हस्त लाभून सर्व क्षेत्रात यश मिळावे आणि पद, प्रतिष्ठा, पैसा, प्रसिद्धी मिळावी यासाठी लक्ष्मी मातेची आवर्जून उपासना करा. देवीला रोज हळद कुंकू फुल वाहून लक्ष्मीचे स्तोत्र पठण करा. श्रीसूक्त म्हणा किंवा श्रवण करा. देवीला रोज गूळ फुटाणे, साखरदाणे किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. चैत्र नवरात्रीनिमित्त हळदी कुंकू समारंभ करा. सवाष्ण जेऊ घाला. शक्य झाल्यास देवीला पुरणवरणाचा नैवेद्य दाखवा.
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त (चैत्र नवरात्र शुभ मुहूर्त)अनेक ठिकाणी शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीतही घटस्थापना केली जाते. त्यादृष्टीने मुहूर्त जाणून घेऊ. चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना प्रतिपदेला म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी केली जाते आणि ही तिथी २ एप्रिलला येते. यंदा चैत्र नवरात्रीला घटस्थापनेचा शुभ मुहूर्त २ एप्रिल रोजी सकाळी ६. १० ते ८.२९ मिनिटांपर्यंत असेल.